Goa assembly monsoon session 2024  Dainik Gomantak
गोवा

Goa Legislative Committees: विधीमंडळ समित्यांच्या बैठकांवरच प्रश्नचिन्ह! कार्यकाळ गेल्या वर्षी संपला; सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये जुंपली

Goa Politics: पीएसीचे अध्यक्ष एल्टन डिकोस्ता व पीयूसीचे चेअरमन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सोमवार २७ रोजी तातडीने बैठक बोलावली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सार्वजनिक लेखा समिती (पीएसी) व सार्वजनीक उपक्रम समिती (पीयूसी) चे अहवाल निर्धारीत दोन वर्षांच्या कार्यकाळात सभागृहात सादर न झाल्याचे ‘गोमन्तक’ने २४ जानेवारी रोजी प्रसिद्ध केले. त्यानंतर, पीएसीचे अध्यक्ष एल्टन डिकोस्ता व पीयूसीचे चेअरमन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सोमवार २७ रोजी तातडीने बैठक बोलावली. परंतु, उभय समित्यांचा कार्यकाळच संपल्याने सदर बैठकांच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

सभापती रमेश तवडकर (Ramesh Tawadkar) यांनी १९ जानेवारी २०२३ रोजी बुलेटिन क्रमांक १८ भाग १ जारी करून विविध सभागृह समित्यांचे २०२३-२०२४ वर्षांच्या कार्यकाळासाठी गठन केले होते. यात कामकाज सल्लागार समिती, अर्थसंकल्प समिती, एस्टीमेट समिती यासह सार्वजनिक लेखा समिती व सार्वजनिक उपक्रम समिती यांचा समावेश होता. विधिमंडळ खात्याच्या बुलेटीन प्रमाणे सर्व समित्यांचा कार्यकाळ २०२४ मध्ये संपला आहे. त्यामुळे जानेवारीत बैठका घेणे नियमबाह्य ठरते. पीएसी व पीयूसीचा कार्यकाळ संपल्यानंतर अहवाल सादर करणे गैर आहे. आता सभापतींनी सर्व सभागृह समित्यांचे पुर्नगठन करावे वा त्यांचा कार्यकाळ वाढवावा लागेल, असे मत ॲड. नरेंद्र सावईकर यांनी मांडले.

दिगंबर कामतांकडून युरींचा दावा फोल

दरम्यान, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी २०१४ पासूनचे पीयूसी अहवाल तयार न झाल्याचा केलेला दावा सदर समितीचे माजी अध्यक्ष दिगंबर कामत यांनी खोडून काढताना, आपण २०१४-१५ ते २०१७-१८ अशा चार वर्षांचे अहवाल तयार करून ते विधानसभेत सादर करण्यासाठी विधिमंडळ खात्याकडे दिले होते व त्याची नोंद १८ जानेवारी २०२३ च्या कामकाज वेळापत्रकात असल्याचे सांगितले. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आपण तयार केलेले अहवाल स्वीकारून ते सादर करण्यास हरकत नसल्याचे दिगंबर कामत म्हणाले.

काँग्रेस, ‘आप’, ‘आरजी’ने भूमिका मांडावी

कॉंग्रेस (Congress),‘आप’ व ‘आरजी’च्या आमदारांचा समावेश असलेल्या, ‘कॅग’ने तयार केलेल्या अहवालांच्या अभ्यासास जबाबदार पीएसी व पीयूसीच्या बैठका वेळेत न घेणे,अहवाल दोन वर्षात साकारण्यात आलेले अपयश यावर कॉंग्रेस, ‘आप’ व ‘आरजी’ पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Russian Woman: 'त्या' रशियन महिलेचे गोव्यातही वास्तव्य, गुहेत दिला बाळाला जन्म; पती उद्योगपती असल्याचीही माहिती, अनेक खुलासे समोर

Goa Weather Update: राज्यात पावसाचा लपंडाव सुरूच! जोरदार सरींनंतर आता पुढील 48 तासांत पावसाची गती मंदावणार

Goa Live News: गोव्याचे नवीन राज्यपाल २६ जुलै रोजी घेणार शपथ

Cricketer Retirement: क्रिकेट विश्वात एकच खळबळ! 'या' मॅचविनर ऑलराउंडरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

Goa Tenant verification: भाडेकरू, पर्यटक पडताळणी हवीच; दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश जारी

SCROLL FOR NEXT