Mugdha Gavkar Dainik Gomantak
गोवा

Goa: संगीत प्रतिभा महोत्सवात मुग्धा गावकरांची प्रस्तुती

नवी दिल्ली (New Delhi) येथील संगीत नाटक अकादमीने पश्र्चिम विभागीय युवा संगीतकार व गायकांसाठी संगीत प्रतिभा हा वर्चुअल महोत्सव आयोजित केला होता.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: नवी दिल्ली (New Delhi) येथील संगीत नाटक अकादमीने पश्र्चिम विभागीय युवा संगीतकार व गायकांसाठी संगीत प्रतिभा हा वर्चुअल महोत्सव आयोजित केला होता. या कार्यक्रमात गायन सादर करण्यासाठी गोव्याची प्रतिभाशाली शास्त्रीय गायिका मुग्धा गावकर (Mugdha Gavkar) हिची निवड करण्यात आली. मुग्धाने या कार्यक्रमात राग गोरख कल्याण हा राग प्रस्तुत केला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यु-ट्युबवरुन संबंध देशामध्ये करण्यात आले होते.  या कार्यक्रमात मुग्धाला हार्मोनियमवर अनय घाटे, तबल्यावर संकेत खलप व तानपुऱ्यावर प्रथा गावकर व मेघा गोबरे (Megha Gobare) यांनी साथ संगत केली.

हा कार्यक्रम महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे 18 जुलै रोजी संध्याकाळी 6.15 वाजता सुरु झाला व जवळ जवळ तीन तास चालला. मुग्धा गावकरने शिवाजी विद्यापिठामध्ये गायकीमध्ये मास्टर्स पदवी सुवर्ण पदकासह प्राप्त केले असुन तीने संगीत विशारद ही पदवीही प्राप्त केली आहे. 2014 साली तिला युवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  संगीत प्रतिभा महोत्सवात त्या दिवशी हृषिकेश मजुमदारने बासरी वादन, जुई घायगुडे पांडेने गायन, अभिषेक बोरकरने सरोदवादन व  हृषिकेश सुरवरोने तबला वादन सादर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT