Porvorim Crime Dainik Gomantak
गोवा

Porvorim Crime: ‘त्या’ व्हायरल व्हिडिओमुळे नाहक मनस्ताप, तो माझा मुलगा नाहीच; माजी आमदारांचा खुलासा

आवेर्तान ः सायबर क्राईम विभागाकडे तक्रार

गोमन्तक डिजिटल टीम

Porvorim Crime पर्वरी येथे जो मारामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यात दिसणारा युवक माझा मुलगा शेनोन नव्हे, असा खुलासा आज माजी मंत्री आणि नावेलीचे माजी आमदार आवेर्तान फुर्तादो यांनी केला.

आज नावेली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत फुर्तादो यांनी हा खुलासा केला. या व्हिडिओमुळे आपले आणि आपल्या मुलाचे नाव विनाकारण बदनाम झाले आहे.

आपण सायबर क्राईम विभागाकडे या बाबत आज तक्रार दिली आहे. हा व्हिडिओ समाज माध्यमावर कुणी अपलोड केला, याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे, असे त्यांनी सांगितले.

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांच्या बरोबर त्यांचे पुत्र शेनोन उपस्थित होता. काल समाज माध्यमावर एक मारामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा मारामारी करणारा फुर्तादो यांचा पुत्र असल्याचे त्यात नमूद केले होते.

या व्हिडिओमुळे आपल्याला विनाकारण मनस्ताप सोसावा लागला. हा व्हिडिओ अपलोड करण्यापूर्वी निदान आपल्याकडे विचारून खात्री तरी करून घ्यायची गरज होती असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT