William D'souza  Dainik Gomantak
गोवा

Goa: ड्रमर मित्राने दोन दिवस फोन उचलला नाही; दरवाजा उघडल्यावर जे दृष्य दिसलं ते पाहून सर्वांचे डोळे पाणावले

William D'souza Passed Away: विलियम यांच्या मृत्यूप्रकरणी अनेकांनी शोक व्यक्त केला.

गोमन्तक डिजिटल टीम

संगीत क्षेत्रात नावलौकिकता मिळवलेले ड्रमर (वादक) विलियम डिसोझा हे आपल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळले. ते ६२ वर्षांचे होते. अन्साभाट, म्हापसा येथे ते एकटेच राहत होते.

विलियम फोन उचलत नसल्याने त्यांचा मित्र घरी पोहचला परंतु दरवाजा उघडत नसल्याने मित्राने पोलिसांशी संपर्क साधला. कालांतराने पोलिसांनी अग्निशमन दलासोबत विलियम यांच्या घराचा मुख्य दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

विलियम यांच्या मृत्यूप्रकरणी अनेकांनी शोक व्यक्त केला. ही घटना आज बुधवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास उघडकीस आली. ते आपल्या बेडरूमधील पलंगावर निपचित पडेलेले व दुर्गंधी येत होती.

विलियम यांचे असे जाणे वेदनादायी !

विलियम यांचा अशाप्रकारे मृत्यू होणे, मनाला चटका लावणारी बातमी आहे. दुर्दैव म्हणजे, त्यांच्यासारख्या कलाकाराच्या जाण्याची माहिती कोणालाही नसणे हे अधिक वेदनादायक आहे.

संगीत क्षेत्राने अष्टपैलू असा वादक गमावला, अशा शब्दांत वैज्ञानिक प्रा. नंदकुमार कामत यांनी भावना व्यक्त केल्या. विलियम यांचा एकाकी अवस्थेत मृत्यू झाला. ते नावाजलेले ड्रमर होते व गोव्याबाहेर त्यांची प्रचंड ख्याती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "चिमुकल्यांचे हात-पाय बांधून अमानुष छळ!" डेकेअर सेंटरचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी 13 जणांना ठोकल्या बेड्या

Goa Professional League 2026: स्पोर्टिंग क्लब द गोवाचा 'विराट' विजय! डॉयल अल्विसची शानदार हॅटट्रिक अन् प्रोफेशनल लीगच्या जेतेपदावर तिसऱ्यांदा कोरलं नाव

Goa River Drowning Cases: गोव्यात बेफिकिरीमुळेच बुडण्याच्या घटनांमध्‍ये होतेय वाढ! सत्तरी तालुक्‍यातही चिंता; मद्यसेवन, सुरक्षेअभावी नद्या बनल्‍या धोकादायक

Harmal Wedding Theft : वीज पुरवठा थांबवून मारला डल्ला, लग्नसोहळ्यातील लुटीचा पडद्याआडून खेळ तपासाचे आव्हान

Bicholim Class 11 Admissions : अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ, विज्ञान शाखेसाठी चुरस; ‘ऑनलाईन’ प्रवेश प्रक्रिया सुरू

SCROLL FOR NEXT