Goa News | Goa Transport Dainik Gomantak
गोवा

Goa Transport : वाहतूक पोलिस अॅक्शन मोडमध्ये; बेकायदा पार्क वाहनांविरोधात दंडात्मक कारवाई

Goa Transport: बेकायदा पार्किंग : फोंडा भागात अपघातांत वाढ

दैनिक गोमन्तक

Goa Transport: बेतोडा येथील बगलमार्ग तसेच ढवळी ते फर्मागुढी रस्त्यावर मोठ्या संख्येने बेकायदा पार्क करणाऱ्या अवजड वाहनांविरोधात वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.

मडकई, बोरी, ढवळी बायपास, बेतोडा व उसगाव या औद्योगिक वसाहतींमध्‍ये मोठ्या संख्येने अवजड वाहने दाखल होत असतात. पण पार्किंअभावी ही वाहने रस्त्याच्या बाजूलाला पार्क करण्‍यात येतात. त्‍यामुळे अधूनमधून अपघात घडतात. त्‍यामुळे पोलिसांनी ही कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

फोंडा वाहतूक पोलिस निरीक्षक कृष्णा सिनारी यांच्या मार्गदर्शनाखाली काल मंगळवारपासून रस्‍त्‍याच्‍या कडेला उभी करून ठेवण्‍यात येत असलेली बेकायदा अवजड वाहने हटविण्‍यास सुरूवात झाली.

संबंधित वाहनांच्‍या चालकांवर दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली व ती यापुढेही सुरूच राहील, असे यावेळी सांगण्‍यात आले. काल ढवळी व बेतोडा परिसरातील बगलमार्गाच्‍या बाजूला पार्क केलेल्या अवजड वाहनांविरोधात ही कारवाईची मोहीम राबविण्‍यात आली.

काही दिवसांपूर्वी कुर्टी-खांडेपार परिसरातील रस्त्यांवर मोठ्या संख्येने बेकायदा पार्क करणारी वाहने अपघातानंतर हटविली होती. त्यामुळे या अवजड वाहनचालकांनी इतर बगलमार्गांचा आश्रय घेण्यास सुरूवात केली आहे. राज्यात ट्रक टर्मिनल नसल्याने इतर राज्यांतून येणाऱ्या अवजड वाहनचालकांची सध्या तारांबळ उडत आहे.

दरम्‍यान, फोंडा वाहतूक पोलिस निरीक्षक कृष्णा सिनारी यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक उपनिरीक्षक मोहन हळर्णकर व अन्य कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला. राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला तसेच बगलमार्गावर अवजड वाहने उभे करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे सिनारी यांनी सांगितले.

अपघातानंतर आली जाग!

यापूर्वी कुर्टी-खांडेपार येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला अवजड वाहने उभी करण्‍यात येत होती. पंधरा दिवसांपूर्वी पार्क केलेल्‍या एका वाहनामुळे अपघात होऊन खांडेपार येथील उमेश हा जागीच ठार झाला होता.

त्‍यामुळे संतप्‍त ग्रामस्‍थांनी संबंधित प्रशासन अधिकाऱ्यांना निवेदन देऊन खांडेपार-कुर्टी रस्त्याच्‍या बाजूला उभी करून ठेवलेली सर्व वाहने हटविली होती. त्‍यामुळे आता या अवजड वाहनचालकांनी बेतोडा ते बोरी बायपास रस्त्याचा आश्रय घेतला आहे. स्थानिकांच्या तक्रारीनुसार आता फोंडा वाहतूक पोलिसांनी तेथे दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.

ट्रक टर्मिनल नसल्‍याने गैरसोय :

उसगाव पंचायत क्षेत्रात ‘नेस्ले’ व ‘एमआरएफ’ या मोठ्या कंपन्‍यात आहेत. दिवसाला अनेक ट्रक या कंपन्‍यांमध्‍ये येत असतात. पण पार्किंगसाठी या कंपन्‍यांनी कोणतीही व्यवस्था केलेली नाही. त्‍यामुळे त्‍यांना जवळच्‍या कुठल्‍या तरी रस्‍त्‍याचा आश्रय घ्‍यावा लागतो. अनेक राज्यांत ट्रक टर्मिनल आहेत, परंतु गोव्‍यात ती व्‍यवस्‍था नसल्‍यामुळे आमची तारांबळ उडते, असे ट्रकचालक शबीर याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT