Goa Politics: Goa Assembly Election 2022 Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: काणकोणात एकही महिला उमेदवार नाही

सात उमेदवारांत एकही महिला नाही : चार नवे चेहरे रिंगणात

दैनिक गोमन्तक

Goa Politics: काणकोण मतदार संघात सध्या 7 उमेदवार निवडणूक रिंगणात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मतदारसंघात पुरुष मतदारांची संख्या जास्त आहे. मात्र, यापूर्वीच्या अंदाजानुसार महिला मतदार मोठ्या संख्येने या ठिकाणी मतदान करत असतात. मतदारसंघात सातपैकी एकही महिला उमेदवार नाही. यावेळी माजी मंत्री रमेश तवडकर, माजी उपसभापती इजिदोर फर्नांडिस, तसेच माजी आमदार विजय पै खोत आदी अनुभवी तीन उमेदवार तर आपचे अनुप कुडतरकर, गोवा फॉरवर्ड व काँग्रेस युतीचे जनार्दन भंडारी, आरजीचे प्रशांत पागी व तृणमूलचे (TMC) महादेव देसाई असे 4 नवे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.मात्र, प्रत्यक्षात 31 जानेवारी रोजी किती उमेदवार रिंगणात असतील ते स्पष्ट होईल.

यंदा पुन्हा एकदा काणकोण मतदारसंघातील भाजपची (BJP) उमेदवारी रमेश तवडकर यांच्याकडे आली आहे. इतके दिवस उमेदवारी आपल्यालाच मिळणार, अशी इच्छा बाळगून असलेल्या व काँग्रेसमधून (Congress) निवडून आल्यानंतर भाजपवासी झालेल्या इजिदोर फर्नांडिस यांचा भ्रमनिरास झाल्याने कार्यकर्त्यांशी संपर्क करून त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केली. सुरुवातीपासून भाजपचे असलेले विजय पै खोत यावेळी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात असतील.शिवाय गोवा फॉरवर्ड-काँग्रेस, आप व तृणमूल, आरजी अशा 5 पक्षांचे 4 नवीन चेहरे मतदारांसमोर येणार आहेत.

तृणमूल पक्षाचे उमेदवार देसाई यांनी यापूर्वीच येथील पाच पंचायत क्षेत्रात कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून प्रचार पूर्ण केलेला असून आता फक्त चिन्ह बदलले असल्याचे त्यांना सांगावे लागणार आहे. अपक्ष उमेदवार विजय पै खोत यांनी नियोजनबद्धरीत्या प्रचार सहा महिन्यांपूर्वीपासून सुरू केलेला असून त्यांना प्रतिसाद लाभत आहे.

प्रचारात प्रत्यक्ष भेटीवर भर

आपचे उमेदवार अनुप कुडतरकर यांनीही लोकसंपर्कावर भर दिलेला आहे. आरजीचे प्रशांत पागी हे प्रत्यक्ष मतदारना भेटत असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. अपक्ष उमेदवार इजिदोर फर्नांडिस यांनी कार्यकर्त्यांची गटवार विभागणी करून लोक संपर्काची जबाबदारी दिलेली असून ते स्वतः मात्र 5 कार्यकर्त्यांना घेऊन प्रचार करत असल्याचे खोतीगावचे सरपंच दया गावकर यांनी सांगितले.

मतदार महिलांमध्ये नाराजी

16,659 महिला मतदार यंदा मतदानास पात्र असूनही एकाही महिला उमेदवाराला कुठल्याही पक्षाने उमेदवारी दिलेली नाही. किंबहुना महिला नेतृत्त्व पुढे यावे,अशा घोषणा केल्या जातात. मात्र जेव्हा संधी देण्याची वेळ येते, तेव्हा कोणत्याही पक्षाचे नेतृत्त्व रस घेत नसल्याचे सांगून महिला मतदारांनी काही प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT