Goa politics: Mickey Pashko Dainik Gomantak
गोवा

युतीला मिकीचा अजूनही विरोध; गद्दार आणि घातकी नकोतच..!

आज जागांसाठी ब्लॅकमेल करणारे उद्या खाती मिळविण्यासाठी ब्लॅकमेल करतील

दैनिक गोमन्तक

मडगाव : राष्ट्रवादी आणि गोवा फॉरवर्ड (Goa Forward) या पक्षा बरोबर युतीची बोलणी चालू आहेत असे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी जरी सांगितले असले तरी अशी युती (Goa Politics) नकोच या भूमिकेवर माजी मंत्री मिकी पाशेको (Mickey Pashko) ठाम आहेत. या युतीमुळे काँग्रेसचा (Congress) फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक होईल असे त्यांनी सांगितले.

आज पणजी येथे पाशेको यांनी आपली ही भूमिका पुन्हा एकदा मांडली. ते म्हणाले, आज हे समविचारी पक्ष आपल्याला जास्तीत जास्त जागां मिळाव्यात यासाठी रोज नवनवीन तारखा जाहीर करून काँग्रेस पक्षाला ब्लॅकमेल करू पाहत आहेत. जर यांच्याशी युती करून सरकार सत्तेवर आले तर उद्या हेच आपल्याला चांगली खाती मिळावीत यासाठी ब्लॅकमेल करतील असे ते म्हणाले.

'गोमंतक'शी बोलताना पाशेको म्हणाले, 'गांधी घराण्यालाही या पक्षाशी युती नकोच आहे. गद्दार व घातकी यांची संगत नको हे राहुल गांधी यांनी यापूर्वीच जाहीर केलेले आहेत. ज्या आमदारांनी काँग्रेसचा त्याग करून भाजपशी घरोबा केला ते गद्दार आहेतच त्याशिवाय भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी मदत करणारे गोवा फॉरवर्ड आणि राष्ट्रवादी हे घातकी आहेत.

फक्त सरकारातून काढून टाकले म्हणून गोवा फॉरवर्ड भाजपला विरोध करत आहे. चर्चिलचा तर कालपरवापर्यंत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या बरोबर हनिमून चालू होता.'

पाशेको म्हणाले, मी माझी भूमिका स्पष्टपणे चिदंबरम आणि गुंडू राव यांच्यासमोर मांडली आहे. काँग्रेसला युतीची गरज नाही. गरज आहे ती राष्ट्रवादी आणि गोवा फॉरवर्डसाठी. या दोन पक्षांचे पुनर्वसन करण्यासाठी काँग्रेसने स्वतःचा बळी देऊ नये अशी माझी इच्छा आहे असे पाशेको म्हणाले. काँग्रेसमध्ये फक्त काही नेत्यानाच ही युती हवी बहुसंख्याना नको अशी एकूण परिस्थिती आहे असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT