Congress Leader P. Chidambaram Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: चिदंबरम यांच्याकडून युतीबाबत चर्चा शक्य

माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम (P. Chidambaram) 25 रोजी दोन दिवसांच्या गोवा (Goa) दौऱ्यावर.

दैनिक गोमन्तक

पणजी: कॉंग्रेसचे (Congress) वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम (P. Chidambaram) 25 रोजी दोन दिवसांच्या गोवा (Goa) भेटीवर येत असून कॉंग्रेसच्या गोव्यातील विविध पक्षांसोबतच्या संभाव्य युतीबाबत चिदंबरम भाष्य करण्याची शक्यता असल्याने त्यांच्या या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. गोव्याचे निवडणूक निरीक्षक म्हणून चिदंबरम यांची हल्लीच नियुक्ती झालेली असून या नियुक्तीनंतर त्यांचा हा पहिलाच गोवा दौरा असेल. त्यापूर्वी गोवा कॉंग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव हे उद्या 23 रोजी गोव्यात दाखल होणार आहेत.

विधानसभा निवडणुकीला अवघे सहा महिने बाकी राहिलेले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे व मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे विविध मतदारंसघाचे दौरे करत आहेत, तर कॉंग्रेस पक्षाने सध्या विविध मतदारसंघातील नेत्यांना प्रवेश देण्याचा सपाटा लावला आहे.

दरम्यान, उद्या गुंडू राव हे गोव्यात दाखल झाल्यानंतर ते राज्यभरातील पक्षाच्या कार्याचा आढावा घेतील. त्यानंतर चिदंबरम गोव्यात दाखल झाल्यानंतर कॉंग्रेसच्या विविध समित्यांची व आमदारांची बैठक घेऊन ते राज्यातील पक्षाच्या एकूण कामाचा आढावा घेतील. तसेच गोवा फॉरवर्ड व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांसोबतच्या संभाव्य युतीबाबतही ते भाष्य करण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT