Goa Politics AAP

 
Dainik Gomantak
गोवा

'भाजप' सरकार कडून होतीये गोव्यातील युवकांच्या भवितव्याची क्रूर थट्टा..!

‘आप’चा सरकारवर निशाणा : अनेक ठिकाणी परिवर्तन यात्रा

दैनिक गोमन्तक

कुडचडे : नावेली मतदारसंघाच्‍या आमदाराने मंत्रीपद आणि मुख्यमंत्रीपद उपभोगले (Goa Politics). तरीसुद्धा हा मतदारसंघ अजूनही मागासलेला आहे. या आमदारांनी (MLA) फक्त स्वतःचा विकास साधला. दुसरीकडे भाजप (BJP) सरकार गोव्यातील (Goa) तरुणांच्या भवितव्याशी खेळत आहे. नोकऱ्या देण्यात पक्षपात करणे हा बेरोजगार युवकांवर अन्याय आहे, असे प्रतिपादन आम आदमी पक्षाच्‍या उपाध्‍यक्षा प्रतिमा कुतिन्‍हो यांनी केले.

‘आप’च्‍या (AAP) परिवर्तन यात्रेत कुतिन्‍हो बोलत होत्‍या. त्‍यांनी तसेच कुडचडेचे प्रभारी नेते गाब्रिएल फर्नांडिस, ‘आप’चे सहसचिव जेम्स फर्नांडिस, कुंकळ्‍ळी विधानसभा प्रभारी प्रशांत नाईक, उपाध्यक्ष कॅप्टन व्हेंझी व्हिएगस आणि नामदेव माशेलकर यांनी अनुक्रमे नावेली, कुडचडे, कुंकळ्‍ळी, बाणावली, सांत आंद्रेत परिवर्तन यात्रा काढली.

कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी मतदारसंघावर सत्ता गाजवून दहा वर्षे झाली आहेत. परंतु येथील लोकांना आमदाराकडून ज्या अपेक्षा होत्या, त्या पूर्ण झाल्या नाहीत. आता लोकांना बदल हवा आहे, असे फर्नांडिस म्हणाले.

कुंकळ्‍ळीत भाजप आणि काँग्रेस (Congress) हे दोन्ही निवडून आले, परंतु फारशी प्रगती झाली नाही. चांदोर आणि गिर्दोलीत प्राथमिक आरोग्य सुविधा नाहीत. ‘आप’ सत्तेवर आल्यास आपण ५० खाटांचे आरोग्यकेंद्र उभारेन, असे आश्‍‍वासन प्रशांत नाईक यांनी दिले. व्हेंझी व्हिएगस यांनीही विचार मांडले.

सांतआंद्रे मतदारसंघ विकासापासून वंचित

सांतआंद्रेच्‍या विद्यमान आमदाराने गेल्या निवडणुकीवेळी काँग्रेसमधून भाजपमध्‍ये प्रवेश केला आणि जनतेचा विश्वासघात केला. सत्ताधारी पक्षात असूनही ते कोणताही विकास साधू शकलेले नाहीत. मतदारसंघात बेरोजगारी वाढत असून आमदाराला काहीच पडलेले नाही. कोरोना महामारीच्या काळातही लोकांना म्‍हणावे तसे सहकार्य मिळाले नाही. गोमंतकीय जनता ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलेल्‍या घोषणांचे कौतुक करत आहे, असे सांतआंद्रेतील ‘आप’चे नेते नामदेव माशेलकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT