Girish Chodankar Dainik Gomantak
गोवा

Goa Politician Scandal: सेक्स स्कँडलमधील सहभागींची नावे मी घेतलेली नाहीत, मात्र या प्रकरणातील मंत्री शोधाच- चोडणकर

Girish Chodankar: मुख्यमंत्र्यांनी सत्य जाणून घ्यावे!

गोमन्तक डिजिटल टीम

Girish Chodankar: सेक्स स्कँडलमध्ये सहभागी असलेला हा ज्येष्ठ मंत्री कोण आहे, याची चौकशी करून सांगावे, असा मूळ प्रश्न मी उपस्थित केला होता आणि याबाबत चौकशी करण्याचे आवाहन पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि पोलिस खात्याला केले होते.

या मागणीचा मी आजही पुनरुच्चार करतो आणि यासंदर्भात स्वतंत्र चौकशीची मागणी करतो. सेक्स स्कँडलमध्ये सहभागी असलेल्या मंत्र्याचे किंवा पीडित महिलेचे नाव मी घेतलेले नाही, असे कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे कायम निमंत्रित सदस्य गिरीश चोडणकर यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, हे अत्यंत दुर्दैवी आहे की, त्या राजकारण्याची चौकशी करून त्याचे नाव लोकांसमोर आणण्याऐवजी काही घटकांनी स्वत:च्या फायद्यासाठी या मुद्द्याचा वापर केला.

मी कधीही नाव न घेतलेल्या आणि मी ओळखत नाही, अशा महिलेला टॅग करून ज्यांनी कुणी पोस्ट फॉरवर्ड केल्या आहेत, त्या कृत्याचा मी निषेध करतो. याची चौकशी होऊनच नंतर आरोपीचे नाव लोकांसमोर आले पाहिजे.

मंत्र्याने केले महिलेचे जीवन उद्ध्वस्त

चोडणकर म्हणाले की, अशा पोस्ट आणि फोटो पोस्ट करू नयेत, ज्यामुळे कोणाच्या वैयक्तिक जीवनावर आणि स्वातंत्र्यावर परिणाम होईल.

परंतु मंत्री असलेल्या व्यक्तीने आपल्या अधिकाराचा आणि पदाचा फायदा घेऊन स्त्रीचा वापर करून तिचे कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त करू नये.

सोशल मीडिया हे सत्य आणि न्याय जाणून घेण्यासाठी एक सशक्त व्यासपीठ आहे, परंतु आपण त्याचा उपयोग सत्याचा प्रसार करण्यासाठी केला पाहिजे. अफवा पसरवून कोणाचीही प्रतिष्ठा खराब करू नये.

मुख्यमंत्र्यांनी सत्य जाणून घ्यावे!

चोडणकर म्हणाले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जे गृहमंत्रीदेखील आहेत, त्यांना पोलिस खात्यामार्फत या प्रकरणाची वस्तुस्थिती नक्कीच कळेल.

मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सत्य जाणून घेण्याची कळकळीची विनंती करतो.

मी फोटो पोस्ट केला नाही!

ज्येष्ठ राजकारणी अधिकाराचा आणि महिलांचा गैरवापर करत आहेत. माझ्या पोस्टमध्ये कोणत्याही स्त्री-पुरुषाचे वैयक्तिक नाव नव्हते किंवा कोणताही फोटो नव्हता.

कोणत्याही महिलेचा अनादर करणारी टिप्पणी नव्हती. माझी पोस्ट ज्या पद्धतीने काही फोटोंसोबत जोडली गेली, त्याची चौकशी व्हावी, असे चोडणकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026: कॅप्टन रजत पाटीदारचा मास्टरस्ट्रोक; आरसीबीने सलग दुसऱ्यांदा जिंकले आयपीएलचे जेतेपद!

Goa Comunidade land: जमीन घोटाळा प्रकरणी सावंत गावकर आक्रमक; सर्वण कोमुनिदादची जमीन, गावकऱ्यांनी अखेर उभारला फलक

Domestic Violence Case: 4 तास अघोरी छळ आणि जीवघेणा ड्रामा! हिस्ट्रीशीटरचा बायकोवर अमानुष अत्याचार; 25 वर्षीय नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Mapusa Municipality: म्हापशातील नोकरभरतीत नियमांचे उल्लंघन! पालिकेतील पदोन्नतीवर प्रश्नचिन्ह, 11 कर्मचाऱ्यांची बढती वादाच्या भोऱ्यात

Goa Bison Attack: गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, पाठीत शिंग खुपसले; स्थानिकांत भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT