Pilgaon Panchayat Dainik Gomantak
गोवा

Goa: पिळगावच्या राजकारणात राजकीय हस्तक्षेप, सरपंच गटाने केला दावा

भाजपची (BJP) पंचायत असलेल्या पिळगाव पंचायतीच्या (Pilgaon Panchayat) 'अविश्वास' राजकारणात राजकीय हस्तक्षेप झाला आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: भाजपची (BJP) पंचायत असलेल्या पिळगाव पंचायतीच्या (Pilgaon Panchayat) राजकारणात राजकीय हस्तक्षेप झाला आहे. असा संशय सरपंच शंकर (निलेश) जल्मी यांच्यासह पंच प्रदीप नाईक आणि ललना गिमोणकर यांनी शुक्रवारी (ता.24) सायंकाळी डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. या हस्तक्षेपाची कल्पना भाजपच्या नेत्यांना देण्यात आल्याची माहिती प्रदीप नाईक (Pradeep Naik) आणि अन्य पंचांनी दिली. पंचायतीतील हा राजकीय हस्तक्षेप आगामी निवडणुकीत भाजपसाठी मारक ठरू शकतो. असेही या पंचांनी म्हटले आहे. पिळगाव पंचायतीच्या सातपैकी उपसरपंचासह मिळून चार पंचायत सदस्यांनी गेल्या मंगळवारी सरपंच निलेश (शंकर) जल्मी यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची नोटीस दिली आहे. या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरपंच जल्मी यांनी आपल्यावरील आरोपही फेटाळून लावले आहेत.

आरोप सिद्ध करात

आपल्यावर अविश्वास ठराव दाखल करताना विरोधकांनी केलेले आरोप विद्यमान सरपंच शंकर (निलेश) जल्मी यांनी फेटाळून लावले आहेत. विकासकामांबाबतीत सहकारी पंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाहीत. आणि पंचायत निधीचा गैरवापर केल्याचा आरोप निरर्थक असल्याचे सरपंच श्री. जल्मी यांनी म्हटले आहे. आपल्यावरील आरोप सिद्ध करा. असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT