Goa Traffic Police Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Police: वाहतूक पोलिसांना हात उगारण्याचा अधिकार नाही...; बाणास्तारीतील घटनेवरुन अमित पालेकर बरसले!

Palekar Criticizes Goa Traffic Police: राज्यात पोलिसांच्या कामावर कुणाचाच वचक राहिलेला नाही. बाणास्तारी येथे वाहतूक पोलिसाने एका व्यक्तीवर हात उगारला.

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात पोलिसांच्या कामावर कुणाचाच वचक राहिलेला नाही. बाणास्तारी येथे वाहतूक पोलिसाने एका व्यक्तीवर हात उगारला. अशाप्रकारे हात उगारण्याचा अधिकार कोणत्याच वाहतूक पोलिसाला नसल्याचे ‘आप’ प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी सांगितले.

पालेकर म्हणाले, पोलिसांवर राजकीय हस्तक्षेप वाढला असून पोलिस महासंचालकांना पूर्ण अधिकार नसल्याचे दिसून येत आहे. ज्यावेळी सामान्य नागरिक पोलिसांकडे न्याय मागण्यासाठी जातो त्यावेळी त्याला न्याय मिळेल, असे वाटले पाहिजे. परंतु चोराला सोडून संन्याशाला पकडण्याचा प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे. पोलिस सर्वसामान्यांचे संरक्षक कमी बाऊन्सर अधिक वाटायला लागले आहेत. नव्याने भरती केलेले पोलिस हे केवळ दंड आकारणीसाठीच ठेवल्याचे दिसून येते.

बॉडी कॅमेरे गेले कुठे?

वाहतूक पोलीसांवर बॉडी कॅमेर असायला हवे होते ते कॅमेरा गेले कुठे ? आज बाणास्तारी येथे घडलेल्या प्रकारात बॉडी कॅमेरा असता तर सत्य काय ते समोर आले असते. पोलिस दंड कमी व इतर गोष्टी अधिक करत असल्याने असे प्रकार सुरू असल्याचे पालेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT