Goa Police  Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Rules: गोवा वाहतूक पोलिसांनी दिले विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे

विद्यार्थ्यांनी हेल्मेट न घातल्यास कॅम्पसमध्ये प्रवेश दिला जाणार नाही ...

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा पोलिस वाहतूक कक्षाने रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांवरील व्याख्यानासाठी आज शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजला भेट दिली; दरम्यान बहुतेक विद्यार्थी हेल्मेट घालत नाहीत असे आढळून आले; विद्यार्थ्यांनी हेल्मेट न घातल्यास कॅम्पसमध्ये प्रवेश दिला जाणार नाही असा सल्ला प्रत्येक कर्मचार्‍यांना देण्याची विनंती यावेळी करण्यात आली आहे.

(Goa Traffic Rules)

दरम्यान, राज्यात अपघातांच्या संख्येत वाढ झाली असुन, नुकत्याच झालेल्या एका अपघातात जीवीत हानी झाली नसली तरी दयानंद बांदोडकर मार्गावरील वाहतूक समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास मोठा अपघाताची शक्यता असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामूळे पोलिस प्रशासनाने तातडीने वाहन चालकांना समज देणे गरजेचे असून पुन्हा असा अपघात होणार नाही यासाठी बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे असल्याचं नागरिकांनी म्हटले आहे.

कसिनोदरम्यान थांबणाऱ्या वाहनांना शिस्त लावण्याची गरज

त्याबरोबर कसिनो असणाऱ्या परिसरात प्रामुख्याने कसिनोसाठी येणारे पर्यटक आणि कसिनोच्या मालकीची चारचाकी वाहने मध्यरस्त्यावरच अचानक थांबतात आणि यामूळे मागील वाहने एकमेकांवर आदळण्याची शक्यता वाढते. यावेळी शिस्त पाळली असती तर आज हा अपघात झाला नसता असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

कसिनोसाठी येणारी वाहने अर्ध्या रस्त्यावर थांबवली जातात

मिळालेल्या माहितीनुसार पोलिस यंत्रणा सायंकाळनंतर काहीशी कमी होते. याचा फायदा घेत कसिनोसाठी येणारी वाहने अर्ध्या रस्त्यावर थांबवली जाऊन आरामात यातून ग्राहकांना उतरले जाते. यामूळे रस्त्यावरील वाहतूकीला खिळ बसते आणि जेव्हा कसिनो ग्राहक आरामात उतरेल तेव्हा अशी वाहने मार्गस्थ होतात. तसेच काही वाहने अर्ध्या रस्त्यावर लावली जातात. यामूळे वाहतूकीसाठी अडथळा निर्माण होत असल्याचं घटनास्थळी एका नागरिकाने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT