Goa Assembly Monsoon Session 2023 | CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Instagram Reels मधून गोव्याची बदनामी केल्यास होणार कारवाई, मुख्यमंत्री सावंतांची अधिवेशनात माहिती

वास्कोचे आमदार कृष्णा दाजी साळकर यांनी शून्य कालमध्ये याबाबत प्रश्न विचारला, त्यावर मुख्यमंत्री सावंत यांनी उत्तर दिले.

Pramod Yadav

Goa Assembly Monsoon Session 2023: सोशल मिडियाच्या माध्यमातून गोव्याची बदनामी केल्यास आता त्या व्यक्तीविरोधात कारवाई केली जाईल. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज पावसाळी अधिवेशानाच्या अकराव्या दिवशी सभागृहात दिली. वास्कोचे आमदार कृष्णा दाजी साळकर यांनी शून्य कालमध्ये याबाबत प्रश्न विचारला, त्यावर मुख्यमंत्री सावंत यांनी उत्तर दिले.

आमदार दाजी साळकर यांनी Instagram Reels मधून गोव्याची बदनामी केली जात असल्याची माहिती सभागृहात केली. इन्स्टाग्रावर एकाने पणजीतील प्रसिद्ध इमॅक्युलेट चर्चची बदनामी केल्याचे सांगितले.

याबाबत सक्त कारवाई करण्याची गरज असल्याची मागणी साळकर यांनी सभागृहात केली. राज्यात येणाऱ्या पर्यटकांचे आम्ही स्वागत करतो पण, अशा पद्धतीने बदनामी करणाऱ्या व्यक्तीचे अकाऊंट ब्लॉक केले जावे असेही साळकर म्हणाले.

दरम्यान, याबाबत उत्तर देताना मुख्यमंत्री सावंत यांनी सायबर विभागाला याबाबत सूचना देऊन कारवाई करण्यास सांगितले असे आश्वासन सभागृहाला दिले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशा पद्धतीचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यात गोवा म्हणजे दारू, बिकिनी असे चित्र रंगवणाऱ्या सोशल मिडियावरील एका कथित इन्फ्लुएंसर तरूणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याला एका गोंयकाराने व्हिडिओच्या माध्यमातून रिप्लाय देखील देण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT