गोवा

Sonali Phogat Death Case: हैद्राबाद पोलिसांचे गोवा पोलिसांवर गंभीर आरोप

गोवा पोलिस सहकार्य करत नाहीत असे म्हणाले हैद्राबाद पोलिस अधिक्षक

गोमन्तक डिजिटल टीम

सोनाली फोगाट हत्या प्रकरण (Sonali Phogat Death Case) देशभरात गाजत आहे. गोवा पोलिसांनी आजवर पाच जणांना या प्रकरणात अटक केली आहे. फोगाट प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी गोवा पोलिस (Goa Police) सध्या हरियाणात आहेत. तसेच, या प्रकरणाचा दुसरा महत्वाचा धागा म्हणजे ड्रग, सध्या या ड्रगवरून अनेक माहिती समोर येत आहे. अशात हैद्राबाद पोलिसांनी (Hydrabad Police) गोवा पोलिसांवर सहकार्य न केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

हैद्राबाद पोलिसांनी गोव्यातील बार्देश येथील ड्रग पेडलर प्रितिश नारायण बोरकर उर्फ बाबू याला 17 ऑगस्ट रोजी अटक केली. प्रितिश हा एक आंतरराज्य ड्रग पेडलर असून, गोव्यात त्याचे मोठे रॅकेट आहे. अमली पदार्थासह हैद्राबाद पोलिसांनी त्याला अटक केले होते.

हैद्राबाद पोलिस अधिक्षक सी व्ही आनंद यांनी याबाबत माहिती देताना असे सांगितले की, 'ड्रग पेडलर प्रितिश नारायण बोरकर उर्फ बाबू बॉस एडमिन याचा सोनाली फोगाट प्रकरणाशी संबंध आहे. गोवा पोलिसांसोबत आमचा जेव्हा संपर्क व्हायचा त्यातून काहीच निष्पन्न व्हायचे नाही. त्याचा निगेटिव्ह रिझल्ट असतो. तसेच आम्हाला ज्याला अटक करायची असते तो सापडत नाही. गोवा पोलिस सहकार्य करत नाहीत असे आम्ही थेट सांगतो.' असे आनंद यांनी म्हटले आहे.

सोनाली फोगाट प्रकरणात कर्लिस क्लबचा कथित मालक एडविन नुनीस याचे सबंध देखील समोर आले आहेत. आणि याची माहिती हैद्राबाद पोलिसांनी गोवा पोलिसांना दिली होती. त्यावरून पोलिसांनी नुनीस आणि ड्रग पेडलर दत्तप्रसाद गावकर याला मागील काही दिवसांपूर्वी अटक केली.

दरम्यान, सोनाली फोगाट प्रकरणाचा तपास गोवा पोलिस करत असताना त्यांच्या तपासावर फोगाट कुटुंबीय देखील समाधानी नसल्याचे सांगितले होते. तसेच, त्यांनी हा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा अशी मागणी केली होती. हरियाणाचे मुख्यमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री यांनी देखील प्रकरण सीबीआय कडे सोपविण्याबाबत सकारात्मकता दाखवली होती. त्यात आता हैद्राबाद पोलिसांनी देखील गोवा पोलिसांबाबत प्रश्न उपस्थित केले असल्याने हे प्रकरणं आणखी काय नवं वळण घेणार हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT