Police Station Attack Case Update Dainik Gomantak
गोवा

मोन्सेरात प्रकरणाची सुनावणी 28 फेब्रुवारी पर्यंत तहकूब

28 फेब्रुवारीला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे

दैनिक गोमन्तक

म्हापसा: राज्यात सर्वत्र चर्चेत असणाऱ्या बाबुश मोन्सेरात आणि जेनेफीर मोन्सेरात यांचे पोलिस स्टेशन हल्ला प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त न्यायालयाने 28 फेब्रुवारी पर्यंत पुढे ढकलली आहे. 28 फेब्रुवारीला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सुनावणी दरम्यान मोन्सेरात दाम्पत्याच्या वकिलांकडून दोघांसाठी सूट दाखल करण्यात आली असुन ती मंजूर देखील करण्यात आली आहे.(Goa Police station Attack Case of Monserrat adjourned to February 28)

काय आहे प्रकरण?

19 फेब्रुवारी 2008 रोजी बाबूश मोन्सेरात यांनी कार्यकर्त्यांसह पणजी पोलीस स्थानकावर मोर्चा नेला होता. एका तरुणाला मारहाणप्रकरणी संशयितांना अटक करण्याची मागणी केली होती. पोलिसांकडून (Goa Police) त्याची दखल न घेतल्याने पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्याची मागणी केली. मात्र, हिंसक कार्यकर्त्यांच्या जमावाने पोलिस स्थानकाबाहेर संरक्षक भिंत तयार करून उभ्या असलेल्या पोलिसांवर प्लास्टिक बाटल्या तसेच दगडफेक करून हल्ला केला होता. या हल्ल्यात पोलीस जखमी झाले होते. पोलिसांनी लाठीमार सुरू केल्यावर सर्व नेते व कार्यकर्ते तेथून पसार झाले होते.

सात वर्षे उलटून गेली तरी या याचिकेवर सुनावणीच झाली नसल्याने ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी अर्ज सादर करून उच्च न्यायालयाच्या निदर्शनास ही बाब निदर्शनास आणून दिली होती. राजकारण्यांवरील खटल्यांची सुनावणी प्राधान्यक्रमाने घेण्याचे निर्देश देणारा निवाडा दिलेला आहे. स्थगिती सहा महिन्यापुरती असते मात्र स्थगिती दिलेली याचिका कित्येक वर्षे प्रलंबित आहेत.

उच्च न्यायालयाने याचिकांवरील सुनावणी घेऊन निर्णय द्यावा अशी विनंती रॉड्रिग्ज यांनी केली होती. राज्यातील विधानसभा निवडणुकीत (Goa assembly Elections) खटल्यातील संशयित बाबुश मोन्सेरात व जेनिफर मोन्सेरात हे भाजपचे उमेदवार आहेत. ते पणजी व ताळगावमधून निवडणूक लढवत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT