Ganja smuggling arrest Goa Dainik Gomantak
गोवा

Margao Crime: मडगाव पोलिसांची छापेमारी! 3.8 किलो गांजासह दोघांना रंगेहाथ पकडले

Ganja Seizure In Margao: मडगाव येथील गांधी रोड येथे पोलिसांनी छापेमारी करुन मोठ्याप्रमाणात गांजा जप्त केला. पोलिसांनी या छापेमारीत 3.08 किलो गांजासह दोघांच्या मुसक्या आवळल्या.

Manish Jadhav

मडगाव: राज्यात गेल्या काही दिवसांत गोवा पोलिसांच्या धडक कारवायाचं सत्र वाढलं आहे. अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी पोलिस ठीक-ठिकाणी छापेमारी करुन मोठ्याप्रमाणात अमली पदार्थ जप्त करत आहेत. यातच आता, मडगाव पोलिसांनी रविवारी (11 मे) छापेमारी करुन तब्बल 3.8 किलो गांजा जप्त केला.

काय आहे नेमकं प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, मडगाव (Margao) येथील गांधी रोड येथे पोलिसांनी छापेमारी करुन मोठ्याप्रमाणात गांजा जप्त केला. पोलिसांनी या छापेमारीत 3.08 किलो गांजासह दोघांच्या मुसक्या आवळल्या. फिरोज सिंकदर पठाण (वय, वर्ष 34) आणि नदीम गौस बागवान (वय, वर्ष 32) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांना गांजाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी धडक छापेमारी केली. जप्त केलेल्या गांजाची बाजारभावानुसार किंमत 3.8 लाख रुपये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

मडगाव पोलिसांची कारवाई

मडगाव शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह पीएसआय स्वदेश, पीएसआय संजय आणि कॉन्स्टेबल प्रणय मोराजकर, विकास नाईक आणि अक्षय असुंदी यांच्या पथकाने ही कारवाई केली. पीआय सुरज सामंत, डीवायएसपी सिद्धांत शिरोडकर आणि एसपी दक्षिण टिकम सिंग वर्मा यांच्या देखरेखीखाली पीएसआय समीर गावकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Plastic Waste Management: बहुपदरी प्लास्टिक पॅकेजिंगवर आता 'डिपॉझिट रिफंड' अनिवार्य करा; गोवा सरकारची 'सीपीसीबी'कडे शिफारस

Asian Games 2026: हॅप्पी बर्थडे चॅम्पियन! लव्हलिना बोर्गोहेनने वाढदिवसाच्या दिवशी जिंकले ‘गोल्ड’; महिला बॉक्सिंगमध्ये भारताला 12 वर्षांनंतर सुवर्ण यश

Goa Water Conservation: गोव्यात पाणीटंचाईची चिंता नको; मे-जूनपर्यंत पुरेल साठा, फळदेसाईंचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन

खरी कुजबुज: काब्रालचे भाजपला नथीतून बाण!

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत मोठा बदल! रोहित शर्मा बाहेर, यशस्वी जयस्वालची एन्ट्री; पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing-11

SCROLL FOR NEXT