Cocaine Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Delhi Drug Case: 'गोवा पोलिस' अंमलीपदार्थांविरोधी गंभीर! 'कोकेन जप्ती'प्रकरणी दिल्ली पोलिसांना करणार सहकार्य

Goa News: गोव्यातून तीन ट्रकांतून हा साठा दिल्लीत नेण्यात आल्याने दिल्ली पोलिस आता गोव्यातील सूत्रधाराच्या शोधात आहेत. त्या तपास कामासाठी गोवा पोलिसांनी सहकार्याचा हात दिल्ली पोलिसांना पुढे केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Delhi Cocaine Drug Case Goa Connection

पणजी: दिल्ली पोलिसांनी ६ हजार ५०० कोटी रुपयांचे कोकेन जप्त केल्यानंतर आता गोवा पोलिसांनी त्याविषयीची माहिती दिल्ली पोलिसांकडून मागवली आहे. अमली पदार्थ गोव्यातून दिल्लीत नेण्यात आल्याचे तपासात पुढे आल्यानंतर आता तपासात सहभागी होण्याची इच्छा गोवा पोलिसांनी दिल्ली पोलिसांकडे व्यक्त केली आहे.

दिल्लीलगतच्या महिपालपूर येथे साठवलेला हा अमलीपदार्थांचा साठा दिल्ली पोलिसांनी जप्त केल्यानंतर केलेल्या तपासात कोलंबिया, दुबई, गोवामार्गे तो दिल्लीत पोहोचला असल्याचे निष्पन्न झाले होते. गोव्यातून तीन ट्रकांतून हा साठा दिल्लीत नेण्यात आल्याने दिल्ली पोलिस आता गोव्यातील सूत्रधाराच्या शोधात आहेत. त्या तपास कामासाठी गोवा पोलिसांनी सहकार्याचा हात दिल्ली पोलिसांना पुढे केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात ९ महिन्यांत १६२ किलो म्हणजे ६ कोटी ५० लाख रुपये किमतीचे अमलीपदार्थ जप्त केले. या प्रकरणांत ११६ जणांना अटकही करण्यात आली आहे. गोवा पोलिस अमलीपदार्थां विरोधात कारवाईसाठी पुरेसे गंभीर असून दिल्ली पोलिसांनी माहिती दिल्यास गोव्यातील तपास काम करून या अमली पदार्थांच्या वाहतूक प्रकरणात गुंतलेल्यांना गजाआड करण्यास महत्त्वाची भूमिका बजावू शकतील. इतका मोठा कोकेनचा साठा गोव्यातून दिल्लीला गेला. याबाबत कुठेच थांगपत्ता लागला नव्हता, पण आत्ता या प्रकरणाचा गोवा-दिल्ली पोलिस छडा लागणार आहे.

चारजणांकडे १५ किलो अमलीपदार्थ

दिल्लीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिपालपूर येथील गोदामावर पोलिस छापा टाकायला गेले असताना त्या गोदामाच्या बाहेरच चारजणांकडे १५ किलो अमलीपदार्थ सापडले होते.

विशेष म्हणजे या प्रकरणात पकडण्यात आलेले तुषार गोयल, जितेंदर पाल सिंह ऊर्फ जस्सी, भारत जैन आणि सापडू न शकलेला मुख्य संशयित वीरेंद्र बसोया हे एकमेकांना परिचित नव्हते.

गोयल हा बसोया याला तर जैन हा जस्सी याला ओळखत होता. या अमलीपदार्थ व्यापाराची कुणकुण कोणाला लागू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

SCROLL FOR NEXT