Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: इन्फ्लुएन्सरच्या व्हिडिओची गोष्ट! दिल्ली, हरयाणात 'सर्च ऑपरेशन'; रिकाम्या हाती पथक माघारी, तपास गुंडाळला

Goa Police Search Operation: गोवा पोलिसांनी दिल्ली, हरियाणात सोशल मिडिया इन्फ्लुएंसर्सचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन राबविले.

Pramod Yadav

पणजी: गोवा सरकारची बदनामी केली जात असल्याप्रकरणाचा शोध गेल्या काही दिवासांपासून गुन्हे शाखेचे पोलिस घेतायेत. विविध व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला लक्ष करत प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप होतोय. असे व्हिडिओ करणाऱ्या इन्फ्लुएंसर्सचा शोध घेणाऱ्या गोवा पोलिसांच्या हाती काहीच लागले नसून, त्यांना रिकाम्या हातीच परतावे लागले.

गोवा सरकारच्या भ्रष्टाचारावर भाष्य करणारे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रसिद्ध केले जात आहे. व्हिडिओ विविध माध्यमांद्वारे शेअर करुन गोवा सरकारच्या बदनामीचा कट रचला जातोय, असा संशय व्यक्त केला गेला. गोवा पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी दिल्ली, हरियाणात सोशल मिडिया इन्फ्युएन्सर्सचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन राबविले.

समोर आलेल्या माहितीनुसार, गोवा सरकारची बदनामी करणारे व्हिडिओ WhatsApp वर शेअर केले जात आहेत आणि हा एक मोठ्या कटाचा भाग असल्याची एक तक्रार गोवा पोलिसांना सात ऑगस्ट रोजी प्राप्त झाली.

हे व्हिडिओ स्वतंत्र पत्रकार आणि YouTubers चे असल्याची माहिती समोर आली. या व्हिडिओच्या माध्यामातून राज्यातील जमीन घोटाळे आणि इतर भ्रष्टाचार संबधित गोष्टींवर भाष्य करण्यात आले आहे. दरम्यान, असे व्हिडिओ राज्य सरकारची बदनामी करत असल्याचा दावा करण्यात आला.

व्हिडिओ ज्या WhatsApp द्वारे शेअऱ झाले त्या मोबाईल नंबरचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर दिल्ली आणि हरियाणात देखील शोध मोहिम राबविण्यात आली. संवेदनशील प्रकरण असल्याने पोलिसांनी याबाबत कोणतीही पोलिस तक्रार दाखल केली नाही.

पोलिसांच्या तपासात व्हिडिओ अनेकवेळा शेअर झाल्याचे समोर आले. तसेच, मोबाईल नंबरद्वारे मुख्य संशयितापर्यंत पोहोचण्यास पोलिसांना शक्य झाले नाही. त्यामुळे पोलिस माघारी परतले आहेत. कोणताही सोशल मिडिया इन्फ्युएन्सरचा तपास सुरु नसल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रवि प्रदोष आणि मासिक शिवरात्रीचा दुहेरी योग! 'या' राशींवर महादेवांची विशेष कृपा, यश-समृद्धीचे संकेत

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

SCROLL FOR NEXT