Goa Jobs Scam Dainik Gomantak
गोवा

Goa Recruitment Scam: गोवा पोलिस नोकरभरतीत महाघोटाळा

आरोग्य खात्यात मंत्र्यांनी 80 टक्के नोकऱ्या सत्तरी तालुक्यातील उमेदवारांना दिल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा राज्यात (Goa Election) निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी नोकरभरती (Job Recruitment) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तसेच नोकऱ्यांचा लिलाव करून केलेले घोटाळे (Scam) एकामागोमाग विरोधकांनी उघड केले आहेत. पोलिस खात्यात कॉन्स्टेबल व उपनिरीक्षक पदासाठी (Goa Police Bharti) काल जाहीर झालेल्या उमेदवारीच्या निवड यादीत महाघोटाळा झाला आहे. गुणांमध्ये केलेल्या फेरफारचा पर्दाफाश काँग्रेसने (Congress) करून याविरुद्ध न्यायालयात जाणार असल्याचा इशारा दिला आहे. गुणवत्ता असलेल्या उमेदवारांच्या भवितव्याशी हे सरकार (Goa Government) खेळत असल्याचा आरोप काँग्रेसने केला.

सार्वजनिक बांधकाम, नदी परिवहन व आरोग्य खातेपाठोपाठ आता पोलिस खात्यामध्ये मोठा भ्रष्टाचार तसेच फेरफार करून घोटाळा केला असल्याचा दावा काँग्रेस प्रदेश युथ अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी पुराव्यानिशी केला. पोलिस खात्यातील कॉन्स्टेबल पदासाठी ज्या उमेदवारांना 30 ते 50 पेक्षा कमी गुण लेखी परीक्षेत मिळाले आहेत त्यांना उपनिरीक्षक पदासाठी दिलेल्या लेखी परीक्षत 90 पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. यावरून या उमेदवारांची बुद्धिमत्ता कॉन्स्टेबल पदासाठी कमी व उपनिरीक्षक पदासाठी सर्वाधिक कशी असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

खोटी आश्वासने, फसवणूक हाच भाजपचा विकास...

पुढील सरकार हे भाजपमुक्त सरकार असणार आहे त्यामुळे युवकांनी भाजपच्या या फसव्या आश्‍वासनांना बळू पडू नये. ही निवड प्रक्रियाच पूर्णपणे बेकायदेशीर असल्याने सत्तेवर काँग्रेस आल्यावर ती रद्द करणार आहे. न्यायालयात या निवड प्रक्रियेविरुद्ध जाणार असल्याने निवड झालेले उमेदवार अडचणीत येऊ शकतात. युवकांना खोटी आश्‍वासने व फसवणूक करणे हाच भाजपचा विकास आहे, अशी टीका म्हार्दोळकर यांनी केली.

80 टक्के नोकऱ्या सत्तरीलाच

आरोग्य खात्यात मंत्र्यांनी 80 टक्के नोकऱ्या सत्तरी तालुक्यातील उमेदवारांना दिल्या आहेत. निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर होण्यापूर्वीच उमेदवारांना त्यांच्या राहत्या घरी नियुक्तीपत्रे पोहचली हे स्पष्ट केले होते. त्या याद्याही काँग्रेसने उघड केल्या त्यामध्ये कोणताच बदल नव्हता. यावरून सर्व नोकऱ्या मर्जीतील उमेदवारांना देण्याचा कटकारस्थान रचले गेले होते. पदानुसार काही नोकऱ्या लाखो रुपयांना विकल्या गेल्या आहेत, असा आरोप म्हार्दोळकर यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT