Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa Police Recruitment : गोवा पोलीस भरती 8 दिवसात सुरु करणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा; भरती प्रक्रिया आचारसंहितेमुळे रखडल्याचं स्पष्टीकरण

आदित्य जोशी

Goa Police Recruitment : गोवा पोलीस भरती प्रक्रिया 8 दिवसात सुरु करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. गोवा पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आधी विधानसभा आणि त्यानंतर पंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे प्रक्रिया रखडल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी दिलं.

गोव्यात सध्या वाढत्या गुन्हेगारीमुळे सरकार आणि गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मात्र कोव्हिड नंतरच्या काळात ही गुन्हेगारी वाढली असून यात राज्याबाहेरील लोकांचा सहभाग असल्याचा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी केला आहे. तसंच गोव्यात गुन्ह्यांच्या तपासाचा दरही देशात सर्वाधिक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. पोलिसांच्या कामामध्ये आपण गृहमंत्री म्हणून कोणताही हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे अन्य राजकारण्यांचा हस्तक्षेप असण्याचं कारण नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान हैदराबाद पोलिसांकडून गोवा पोलिसांवर विनाकारण आरोप होत असल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी केलेल्या मेलला अजूनही उत्तर न दिल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

गोव्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन तत्पर असून गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांनी अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. याच कारवाईचा एक भाग म्हणून अमली पदार्थ विरोधी पथकाने तीन ड्रग तस्करांना तुरुंगात टाकलं आहे. यापुढेही अशाच प्रकारची धडक कारवाई पोलिस पथकाकडून सुरु राहील असं मुख्यमंत्री म्हणाले.

तसंच राज्यात आयोजित केल्या जाणाऱ्या ड्रग्ज पार्टी किंवा ज्या पार्टीमध्ये ड्रग्जचं सेवन होत असेल अशांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसंच पोलीस कारवाईच्या माध्यमातून आम्ही ड्रग्जची गरजच गोव्यातून संपवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

दुसरीकडे महिलांवरील अत्याचारावरही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं. माहितीतल्या माणसाकडूनच लैंगिक अत्याचार होत असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. ओळखीचा फायदा घेत महिलांवर अत्याचार केले जातात, ज्यात प्रामुख्याने अल्पवयीन मुलीही बळी पडताना दिसत आहे. मात्र आता हे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी महिला पोलिसांच्या माध्यमातून जनजागृती करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. यासोबतच विविध संस्थांच्या मदतीतून विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण देऊन त्यांचं प्रबोधन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

गोव्यात अपघाती मृत्यूंचं प्रमाण हे फार मोठं आहे. याला वाहतुकीचे नियम न पाळणं हेच महत्त्वाचं कारण आहेत. ड्रंक अँड ड्राईव्ह आणि वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळेच अपघात होऊन त्यात अनेकांना आपला जीव गमावावा लागल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT