Goa Theft Case Canva
गोवा

Goa Theft Case: लाखोंचं सोनं अन् रोकड घेवून फरार झालेला राजू अखेर पंजाबमध्ये आला गोवा पोलिसांच्या तावडीत!

Raju Sonar Arrested In Punjab: पेडणे पोलिसांनी चोरीच्या एका प्रकरणात पंजाबमधून एकाच्या मुसक्या आवळल्या. 23.4 लाखांचे सोने आणि रोकड घेवून राजू सोनार नावाचा व्यक्ती फरार झाला होता.

Manish Jadhav

पेडणे पोलिसांनी चोरीच्या एका प्रकरणात पंजाबमधून एकाच्या मुसक्या आवळल्या. 23.4 लाखांचे सोने आणि रोकड घेवून राजू सोनार नावाचा व्यक्ती फरार झाला होता. रुत्विक विलास पांडुरकर (वय, वर्ष 22) याने राजूच्या विरोधात पेडणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या चोरीच्या प्रकरणी पोलिसांनी राजूचा शोध सुरु केला होता.

रुत्विकने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान राजूला नवीन दागिने तयार करुन देण्यासाठी 18.2 लाख रुपये किमतीचे जुने सोने आणि 5.2 लाखांची रोकड दिली होती.

दरम्यान, रुत्विकने नोंदवलेल्या तक्रारीनुसार पोलिस राजूचा शोध घेत धारगळ येथील त्याच्या निवासस्थानी पोहोचले होते. मात्र राजू घटनास्थळी पोलिसांना मिळाला नाही. त्यानंतर राजूच्या शोधात पेडणे पोलिसांनी पंजाब गाठले. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, राजू रुत्विकला गंडा घालून पंजाबला पोहोचला आहे. पंजाबमधील (Punjab) पुरोवाल जट्टन येथे तो पोलिसांच्या हाती लागला. पेडणे पोलिस बुधवारी (18 डिसेंबर) राजूला गोव्यात घेवून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Plastic Waste Management: बहुपदरी प्लास्टिक पॅकेजिंगवर आता 'डिपॉझिट रिफंड' अनिवार्य करा; गोवा सरकारची 'सीपीसीबी'कडे शिफारस

Asian Games 2026: हॅप्पी बर्थडे चॅम्पियन! लव्हलिना बोर्गोहेनने वाढदिवसाच्या दिवशी जिंकले ‘गोल्ड’; महिला बॉक्सिंगमध्ये भारताला 12 वर्षांनंतर सुवर्ण यश

Goa Water Conservation: गोव्यात पाणीटंचाईची चिंता नको; मे-जूनपर्यंत पुरेल साठा, फळदेसाईंचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन

खरी कुजबुज: काब्रालचे भाजपला नथीतून बाण!

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत मोठा बदल! रोहित शर्मा बाहेर, यशस्वी जयस्वालची एन्ट्री; पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing-11

SCROLL FOR NEXT