Goa Police Arrest Iranian Citizen  Dainik Gomantak
गोवा

Goa Police Raid: हणजूणात पोलिसांची छापेमारी! 5 लाखांच्या कोकोनसह इरानियन नागरिकास अटक; पुणे कनेक्शन आलं समोर

Goa Police Raid in Anjuna: गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी (19 डिसेंबर) हणजूण येथे छापा टाकून इरानियन नागरिक मेहदी वाजीही (वय वर्ष 33) याला अटक केली.

Manish Jadhav

Goa Police Arrest Iranian Citizen With Cocaine In Anjuna

पणजी: गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी (19 डिसेंबर) हणजूण येथे छापा टाकून इरानियन नागरिक मेहदी वाजीही (वय वर्ष 33) याला अटक केली. पोलिसांनी यावेळी त्याच्याकडून 51 ग्रॅम कोकेन जप्त केले. जप्त केलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात 5 लाख रुपये एवढी किंमत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

राज्यात सध्या पर्यटन हंगाम सुरु असून मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे पोहोचले आहेत. याचदरम्यान, पुणे येथे सध्या वास्तव्यास असलेला इरानियन नागरिक हणजूण येथे कोकेनची विक्री करण्यासाठी येत असल्याची टीप पोलिसांच्या माहिती कक्षाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार कक्षाच्या पथकाने या भागात सापळा रचला. हणजूण (Anjuna) येथे तो दुचाकीने आला असता कक्षाच्या पोलिसांनी त्याला अडवले आणि त्याची झडती घेतली. या झडतीदरम्यान त्याच्याकडे कोकेन मिळाले. तो पार्ट्यांमध्ये कोकेनची विक्री करण्यास आला होता अशी माहिती त्याने चौकशीदरम्यान पोलिसांना दिली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा आणि उपधीक्षक नेर्लोन अल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सजीथ पिल्ले आणि त्यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गिरीश पाडलोस्कर करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT