Goa Police  Dainik Gomantak
गोवा

...तरच गोव्यात पोलिसांना वाहनं अडवता येणार!

पोलीस महानिरीक्षकांकडून आदेश जारी; विनाकारण गाड्या अडवून दंडवसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांना चाप

आदित्य जोशी

पणजी : गोव्यात 1 एप्रिल 2022 पासून नवीन मोटर वाहन कायदा लागू करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांकडून याची कडक अमलबजावणी करत बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा धडाकाच पोलिसांनी लावला आहे. मात्र याचा फटका अनेकदा सर्वसामान्य नागरिकांना होताना दिसून आला. तशाप्रकारच्या तक्रारीही प्रशासनाकडे करण्यात आल्या. आता गोव्याच्या पोलीस महानिरीक्षकांनी यावर तोडगा काढत एक आदेश जारी केला आहे, ज्यात कारणाशिवाय गाड्या न अडवण्याची तंबीच पोलिसांना देण्यात आली आहे.

गोव्याचे पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग यांनी आज एक परिपत्रक जारी केलं आहे. त्यात म्हटलं आहे की, बऱ्याचदा पोलीस विनाकारण गाड्या थांबवून त्यांची तपासणी करतात. यामुळे सर्वसामान्य वाहनचालकांचा वेळ वाया जातो आणि त्यांना नाहक मनस्तापही सहन करावा लागतो. पोलीस हे सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी आहेत आणि त्यांनी लोकांच्या समस्या सोडवणं गरजेचं आहे. वाहतूक पोलिसांचं मुख्य काम हे वाहतूक सुरळीतपणे चालू ठेवणं असून कोंडी होणार नाही याची काळजी घेणं आहे.

त्यामुळे यापुढे वाहतूक पोलिसांनी तेव्हाच वाहनं थांबवावी, जेव्हा चालकाकडून वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन झालं असेल. पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक (वाहतूक), वाहतूक शाखेचा इनचार्ज आणि पोलीस स्थानकांना तशा प्रकारचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच नियम मोडणाऱ्या वाहन चालकाला चलन बजावण्याचा अधिकारही वाहतूक शाखेच्या पोलीस उपअधीक्षक किंवा अधीक्षक आणि निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनाच असेल. इतकंच नाही तर वाहनचालकाची कागदपत्रं तपासण्याचा अधिकारही याच अधिकाऱ्यांना असेल. निरीक्षकाव्यतिरीक्त त्याखालील कोणत्याही अधिकाऱ्यांना गाडीची कागदपत्र तपासण्याचा अधिकार नसेल असं या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

तसंच या आदेशाची काटेकोर अमलबजावणी करण्याचे निर्देश गोव्याच्या पोलीस महानिरीक्षकांनी दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT