Goa Police Dainik Gomantak
गोवा

पहिल्याच दिवशी दणका, नवीन मोटर वाहन कायद्याची काटेकोर अमलबजावणी

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर कारवाई, अनेक ठिकाणी पोलिसांशी वादावादी

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात आज 1 एप्रिलपासून नवीन मोटर वाहन कायद्याची अमलबजावणी सुरु झाली आहे. पहिल्याच दिवशी गोव्यात ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे वाहनचालकांचं मात्र धाबं दणाणल्याचं चित्र आहे. दंडाची रक्कम कैकपटींनी जास्त असल्याने वाहनचालकांची काही ठिकाणी पोलिसांशी वादावादी झाल्याचं समोर आलं आहे.

गोवा (Goa) राज्यातील मोटार वाहतुकी नियमात मोठे बदल करण्यात आले आहेत. या नियमाचा भंग करणाऱ्याला आधी देण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेच्या तुलनेत दहापट दंड देण्याची पाळी येणार आहे त्यामुळे सर्वानी नियमाच्या चौकटीत राहून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, अशी विनंती दक्षिण गोवा वाहतूक पोलीस (Traffic Police) उपअधीक्षक धर्मेश आंगले यांनी केली आहे. पोलीसांशी वाहनचालकांनी हुज्जत न घालण्याचं तसंच वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

याचसंदर्भात पुढे त्यांनी बोलताना सांगितले की, या कायद्याची अमलबजावणी 1 एप्रिलपासून करण्यात आली असून या नव्या वाहतूक नियमामुळे राज्यातील अपघातांना मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. वाहतूक पोलिसांकडून (Police) देण्यात येणारे चलन इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे देण्यात येईल. त्यामुळे एका चालकाने किती वेळा नियमाचा भंग केला, त्यानुसार दंडाची (Penalty) रक्कम प्रत्येकवेळी वाढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. हे इलेक्ट्रॉनिक मशीन राज्यातील नेटवर्क यंत्रणेशी जुळले आहे . ते रात्री बारापर्यंत कार्यन्वित राहणार आहे, त्यानंतर ते पुन्हा अपग्रेड केले जाणार आहे.

गोवा राज्यात मोटर वाहन कायदा 1998 मधील तरतुदींमध्ये जुलै 2021 मध्ये बदल केले होते. आता या नव्या तरतुदींची अमलबजावणी 1 एप्रिल 2022 पासून गोव्यात केली जाणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांना सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन दक्षिण गोवा वाहतूक पोलीस उपअधीक्षकांनी केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT