Goa Police Football Cup Dainik Gomantak
गोवा

Goa Police Football Cup: ‘शापोरा युवक’चा चर्चिल ब्रदर्सला धक्का

टायब्रेकरमध्ये बाजी, सेझा अकादमीही उपांत्य फेरीत

दैनिक गोमन्तक

पणजी: सलग दुसऱ्या लढतीत सामनावीर ठरलेल्या सोमा कोरगावकर याच्या अफलातून कामगिरीच्या बळावर शापोरा युवक संघाने गोवा पोलिस कप फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी बलाढ्य चर्चिल ब्रदर्सला जबरदस्त धक्का दिला. टायब्रेकरमध्ये त्यांनी 4-2 फरकाने विजय नोंदवून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर सामना झाला.

एला-जुने गोवे येथील मैदानावर सेझा अकादमीने यूथ क्लब ऑफ मनोरा संघाला 2-1 फरकाने नमवून उपांत्य फेरी गाठली. सामन्यातील तिन्ही गोलची नोंद अखेरच्या चौदा मिनिटांच्या खेळात झाली. श्रीधरनाथ गावस याने 76 व्या मिनिटास सेझा अकादमीस आघाडी मिळवून दिल्यानंतर 80 व्या मिनिटास कुणाल साळगावकरने संघाची आघाडी वाढविली.

90+ 4 व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर एल्डन कुलासो याने मनोरा संघाची पिछाडी एका गोलने कमी केली. त्यापूर्वी मनोरा संघास 87 व्या मिनिटास आणखी एक पेनल्टी फटका मिळाला होता, पण बेकहॅम सिंग याचा फटका सेझा अकादमीचा गोलरक्षक रोनाल गावकार याने अचूक अंदाज बांधत अडविला. सेझा अकादमीचा कुणाल साळगावकर सामन्याचा मानकरी ठरला.

सोमा पुन्हा एकदा लक्षवेधी

स्पर्धेच्या पहिल्या फेरीत शापोरा युवक संघाने माजी विजेत्या एफसी गोवा संघाला टायब्रेकरद्वारे 4-3 फरकाने हरविले होते. तेव्हा गोलरक्षक सोमा कोरगावकर लक्षवेधी ठरला होता. त्याने शुक्रवारीही प्रेक्षणीय गोलरक्षणाद्वारे चर्चिल ब्रदर्स संघ आगेकूच राखणार नाही याची दक्षता घेतली. धुळेर स्टेडियमवर निर्धारित नव्वद मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांना गोल नोंदविता आले नाही.

टायब्रेकरमध्ये शापोरा युवक संघाच्या स्टीफन मार्टिन, दिनेश मोरजकर, अक्षय दाभोळकर व हर्षद गावकर यांनी अचूक नेमबाजी केली. चर्चिल ब्रदर्सचे केवळ रिचर्ड कॉस्ता व लालॉम्पुईया साईलो हेच गोलरक्षकालस चकवू शकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT