8.98 lakh Drugs Recovered In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: गोवा पोलिसांचा दणका! वागातोर येथे 8.98 लाखांच्या ड्रग्जसह तरुणाला अटक; दोन दिवसांतील दुसरी मोठी कारवाई

8.98 lakh Drugs Recovered In Goa: शनिवारी (22 मार्च) गोवा पोलिसांनी वागतोर येथे छापेमारी करुन तब्बल 8.98 लाखांच्या ड्रग्जसह एका स्थानिक तरुणाला पोलिसांनी अटक केली.

Manish Jadhav

Goa Police Drug Bust Vagator Local Arrested 8.98 Lakh Drugs Seized

बार्देश: गेल्या काही दिवसांत गोवा पोलिसांच्या बेकायदेशीर ड्रग्जविरोधात कारवाया वाढल्या आहेत. यातच, शनिवारी (22 मार्च) गोवा पोलिसांनी वागतोर येथे छापेमारी करुन तब्बल 8.98 लाखांच्या ड्रग्जसह एका स्थानिक तरुणाला अटक केली. विशेष म्हणजे, गोवा पोलिसांची ही दोन दिवसांतील ही दुसरी मोठी कारवाई आहे.

वागातोर येथे छापेमारी

गोवा पोलिसांच्या (Goa Police) अंमली पदार्थविरोधी सेलने मिळालेल्या माहितीच्या आधारे शनिवारी वागतोर येथे छापेमारी केली. या छापेमारीत पोलिसांनी तब्बल 8.98 लाखांचे ड्रग्ज जप्त केले. कोकेन, मेथाम्फेटामाइन आणि एक्स्टसीसह एका स्थानिक तरुणाला अटक करण्यात आली. करण गोवेकर (वय वर्ष 33) असे पकडण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून करण गोवा पोलिसांच्या रडारावर होता. आरोपीला कोणत्याही प्रकारचा संशय येऊ नये म्हणून पोलिस खबरदारी घेत होते. याचदरम्यान करण एका ग्राहकाला ड्रग्ज देण्यासाठी वागातोर येथे येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या.

करणकडून ड्रग्जसह कार जप्त

पोलिसांनी वागातोर येथे संशयित करणकडून 37 ग्रॅम कोकेन, 37 ग्रॅम मेथाम्फेटामाइन आणि 15 ग्रॅम एक्स्टसी टॅब्लेट जप्त केले. याशिवाय, पोलिसांनी करणची स्विफ्ट कार (Car) देखील जप्त केली. गोवा पोलिसांची दोन दिवसांतील ही दुसरी मोठी कारवाई केली. यापूर्वी, अरंबोळ येथे छापेमारी करुन एका स्थानिक तरुणाला 2 लाखांचे चरस बाळगल्याप्रकरणी अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

SCROLL FOR NEXT