DGP Alok Kumar Dainik Gomantak
गोवा

Goa Police: "काही कुजक्या फळांमुळे सर्वच बदमान होतायत" डीजीपींकडून पोलिसांच्या डागाळलेल्या प्रतिमेवर खेद व्यक्त

DGP Alok Kumar on Goa Police: अमित नाईक याने आरोपी सुलेमान खानला पळून जायला केलेली मदत, कॅश फॉर जॉब स्कॅम अशा घटनांमुळे पोलिसांकवरचा विश्वास ढाळत चाललाय.

Akshata Chhatre

पणजी: सध्या राज्यात सुरु असलेल्या विविध घटनांमुळे गोवा पोलिसांना नावं ठेवली जातायत, यावर बोलताना पोलीस महासंचालक (DGP) आलोख कुमार यांनी खेद व्यक्त केला. शुक्रवारी (दि. २० डिसेंबर) गोवा पोलीस स्थापना दिवसाच्या निमित्ताने बोलताना त्यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या गैरवर्तवणुकीवर भाष्य केले. हणजूण येथील वाहतूक कर्मचाऱ्यांनी वसूल केलेली खंडणी किंवा अमित नाईकने आरोपी सुलेमान खानला पळून जायला केलेली मदत, कॅश फॉर जॉब स्कॅम अशा एकूणएक घटनांमुळे पोलिसांकवरचा विश्वास ढाळत चाललाय असं ते म्हणालेत.

गोवा पोलीस नेहमीच स्थानिक तसेच पर्यटकांच्या सुरक्षेसाठी दिवस आणि रात्र आटोकाट मेहनत करत असतात, मात्र काही पोलीस कर्मचाऱ्यांकडून उचलली गेलेली चुकीची पाऊलं त्याला गालबोट लावून जातात, यामुळे लोकांचा पोलिसांवरच विश्वास ढळतो आणि गोवा पोलिसांची बदनामी होते.

यावर लवकरच उपाय केला गेला पाहिजे असं म्हणत पोलिसांना नैतिकतेच्या मार्गावर आणण्यासाठी मानसिक घटकावरही भर दिला गेला पाहिजे असं डीजीपी म्हणाले. तसेच अशा घटनांवर आळा बसवण्यासाठी पोलिस अधीक्षक आणि पोलिस उपअधीक्षकांसह मध्यमस्तरीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी लक्ष घालण्याचे आवाहन त्यांनी केले.

पोलीस अधिकाऱ्यांना उत्तमोत्तम सुविधा मिळाव्यात म्हणून केपे,फातोर्डा,कुडतरी येथे नवीन इमारतींचं बांधकाम सुरू आहे, त्यामुळे आपण देखील जबाबदारी चोख बजावत राज्याची सुरक्षा निश्चित केली पाहिजे असे मार्गदर्शन डीजीपी आलोख कुमार यांनी गोवा पोलिसांना केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT