Arrested Dainik Gomantak
गोवा

Goa Police: बाल लैंगिक शोषणप्रकरणी ऑपरेशन ‘सुरक्षा’ अंतर्गत पाचजणांची टोळी गजाआड

पोलिसांची चार वेगवेगळी पथके स्थापन करून ही कारवाई करण्यात आली

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Police गोवा पोलिसांनी ऑपरेशन ‘सुरक्षा’ अंतर्गत बाल लैंगिक शोषणाचे साहित्य तसेच ते प्रसारित केल्याप्रकरणीच्या आरोपाखाली गोव्यातील विविध भागांमध्ये गोवा पोलिसांनी कारवाई करून पाचजणांच्या टोळीला गजाआड केले.

त्यांच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आले असून सीएसएम कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

अटक केलेल्यांमध्ये संशयित सलमान खान (२०, चिंबल), महेंदर सिंग (२७, बेती), लेमन इस्लाम (२४, कळंगुट), प्रणीत लोलयेकर (२४, दवर्ली) व नितीन रेडकर (२३, कळंगुट) यांचा समावेश आहे. या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी सायबर क्राईम, क्राईम ब्रँच व जिल्हा पोलिसांनी ऑपरेशन सुरक्षा अंतर्गत ही संयुक्त कारवाई केली.

संशयित प्रणीत वगळल्यास इतर चौघे संशयित परप्रांतीय आहेत. संशयित सलमान हा मध्यप्रदेशमधील, महेंदर उत्तरप्रदेशमधील, लेमन पश्‍चिम बंगालमधील, तर नितीन हा सिंधुदुर्ग (महाराष्ट्र) येथील आहे. ते गेली अनेक वर्षे गोव्यात राहत आहेत.

समाज माध्यमांद्वारे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्याचा पीडितांवर विपरीत परिणाम होण्याची अधिक शक्यता असते. फेसबूक व इन्स्टाग्रामवरून अशाप्रकारचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर केंद्रीय सर्वेलन्स यंत्रणेद्वारे लक्ष ठेवण्यात येते.

त्यानुसार गोव्यात काही तरुण असे प्रकार करत असल्याचे या यंत्रणेला आढळून आले होते व त्याची माहिती गोवा पोलिसांना देण्यात आली होती. गोवा पोलिसांनी सायबर क्राईममधील अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून या तरुणांची माहिती मिळवली.

ज्या ठिकाणी ते राहत आहेत तेथील परिसरातून ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची चार वेगवेगळी पथके स्थापन करून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Akshat Naik Death Case: 'अक्षत' मृत्यूप्रकरणी नव्याने तपास करा, वडिलांची पोलिसांत तक्रार, पुरावे लपविल्याचा आरोप

Monsoon Tourism: सोशल मीडियासाठी रिल्स, सेल्फीचा नाद घेतो जीव! पावसाळी पर्यटनाचा मुद्दा बनला जटिल; धारबांदोड्यात 17 धोकादायक स्थळे

Karapur Sarvan Sarpanch: कारापूर-सर्वण सरपंच निवडीसाठी मंगळवारी बैठक, बिंदिया सावंत यांचे नाव निश्‍चित तरी उत्सुकता

Goa Monsoon: पावसाचा 20 इंचांचा टप्पा पार, मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम; रविवारी 1 इंच पावसाची नोंद

खरी कुजबुज: काँग्रेस व भाजप अंतर्गत वादाच्या भोवऱ्यात!

SCROLL FOR NEXT