Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: नझीम अस्लमविरोधात फोंडा, वाळपईत गुन्हा; हिंदु धर्माविरोधात सोशल मीडियात केली होती आक्षेपार्ह पोस्ट

क्राईम ब्रँचने सोशल मीडियात वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यास घेतले ताब्यात

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Police: हिंदू धर्माविरोधात सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या नझीम अस्लमविरोधात फोंडा आणि वाळपई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, भडकाऊ वक्तव्ये करणारे, सोशल मीडियात भडकाऊ पोस्ट करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. क्राईम ब्रँच पोलिसांनी ही कारवाई केली आहे. काही दिवसांपुर्वी गोव्यात मुस्लीम समुदायाने ठिकठिकाणी आंदोलन केले होते.

सोशल मीडियातील वादग्रस्त पोस्ट त्याला कारणीभूत ठरली होती. त्यातील मुख्य संशयिताला पकडले आहे, अशी माहिती क्राईम ब्रँचने दिली आहे. तसेच मडगाव, फोंडा येथे याबाबत एफआयआर दाखल झाल्या आहेत, अशी माहितीही देण्यात आली.

ताब्यात घेतल्यांकडे चौकशी सुरू आहे. त्यांनी सोशल मीडियातून काय पोस्ट केले होते, त्याविषयी माहिती दिली आहे. किती लोक यात गुंतले होते याची अद्याप माहिती कळलेले नाही. चौकशीअंती सत्य समोर येईल.

सध्या ज्यांनी कुणी हे केले आहे, त्यांची ओळख पटली आहे, हे महत्वाचे आहे, असे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kasaarvarne School Vandalism: कासारवर्णेच्या शाळेत तोडफोड; खिडक्यांच्या काचा फोडल्या, नळाची जोडणीही तोडली, पोलिसांत तक्रार

Viral Stunt Video: पठ्ठ्यानं 'नागराजा'सोबत घेतला पंगा, जीवघेणा स्टंट व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अरे भाई, हा जिवंत आहे की गेला'?

भारतासाठी खूशखबर! कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांच्या औषधांना 100 टक्के टॅरिफमधून सूट, अमेरिकेत भारतीय औषधांची निर्यात होणार सोपी

Viral Post: "आई-वडिलांना देव मानू नका..." CEO च्या 'त्या' वादग्रस्त पोस्टने खळबळ; सोशल मीडियावर दोन गटांत जुंपली, वाचा संपूर्ण प्रकरण

Election Commission: धुके दाटलेले... निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासाचा कस

SCROLL FOR NEXT