Goa Crime News dainik gomantak
गोवा

Goa Crime: लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार, पाच लाखही लुबाडले; न्हयबाग येथील व्यक्तीविरोधात गुन्हा

Pernem Goa News: पाच वर्षे लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार महिलेने दिली आहे. तसेच, पाच लाख रुपये घेतल्याचे तक्रारीत म्हटलंय.

Pramod Yadav

पेडणे: लग्नाचे आमिष देऊन महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी न्हयबाग येथील व्यक्तीविरोधात पेडणे पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आलाय. संशियत व्यक्तीने पीडित महिलेला पाच लाख रुपयांचा गंडा देखील घातल्याचा आरोप पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी राकेश (रा. न्हयबाग) याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित राकेशने पीडित महिलेसोबत मैत्री करुन लग्नाचे आमिष दिले. यानंतर तब्बल पाच वर्षे लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार महिलेने दिली आहे. तसेच, वेळोवेळी विविध कारणांसाठी पाच लाख रुपये घेतल्याचे तक्रारीत म्हटलंय.

संशयिताने घेतलेले पैसे माघारी केले नाहीत तसेच, लग्नाचे वचन देखील पूर्ण केले नाही. पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संशयित राकेश विरोधात गुन्हा नोंदवला असून, पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT