Goa Crime  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : अखेर मुसक्या आवळल्याच; चोराच्या नावावर चोरी, घरफोडीचे 48 गुन्हे!

ओडिशातील नयागढ येथील रहिवासी असलेल्या दास याचा ओडिशात 15, आंध्र प्रदेशात 29 आणि कर्नाटकातील 4 चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime : आंतरराज्य चोरी प्रकरणांत हिटलिस्टवर असलेल्या ओडिशातील सराईत गुन्हेगार संतोष कुमार दास (42) याच्या पणजी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पणजी आणि पर्वरी येथे एकूण 48 घरे फोडणे, चोरी आणि दरोड्याच्या प्रकरणांमध्ये पोलिसांना तो हवा होता. आज अखेर तो पोलिसांच्या हाती लागला.

ओडिशातील नयागढ येथील रहिवासी असलेल्या दास याचा ओडिशात 15, आंध्र प्रदेशात 29 आणि कर्नाटकातील 4 चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मिरामार स्किन क्लिनिकमधील 1.57 लाख रुपयांच्या चोरी प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना त्याचा सुगावा लागला.

चोराने क्लिनिकच्या आवारातून सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरला होता. त्याने डीव्हीआरमधून डेटा साफ केला आणि तो काकुलो कॉलनीजवळ फेकून दिला. पोलिसांना डीव्हीआर शोधण्यात यश आले असून त्यातील डेटाही मिळाला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुन्हेगार आवारात प्रवेश करताना दिसतो. शेजारच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने निदर्शनास आणले की, त्या व्यक्तीने क्लिनिकमध्ये येण्यासाठी भाड्याची दुचाकी वापरली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

Budh Gochar 2026: हस्त नक्षत्रात बुधाचे महागोचर! 5 राशींच्या जातकांची तिजोरी पैशांनी ओसंडून वाहणार; व्यवसायात येणार मोठी तेजी

SCROLL FOR NEXT