Goa Police|Thief arrested  Dainik Gomantak
गोवा

Goa Police: गोवा व्हाया बंगळुरू! सराफी दुकानातील चोरीप्रकरणी टोळीला बंगळुरूमध्ये अटक

चोरट्यांच्या टोळीला पणजी पोलिसांनी तपास करून बंगळुरू येथे ताब्यात घेतले.

दैनिक गोमन्तक

Goa Police: राजधानी पणजीतील एका सराफी दुकानात चोरी करून पसार झालेल्या चोरट्यांच्या टोळीला पणजी पोलिसांनी तपास करून बंगळुरू येथे ताब्यात घेऊन काल त्यांना गोव्यात आणले.

या टोळीने चोरलेले लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने कोठे विकले याची माहिती उघड केलेली नाही. या टोळीमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. त्यांनी वास्को येथेही अशाच प्रकारचा गुन्हा केल्याची माहिती समोर आली आहे.

बंगळुरू येथे अटक करून आणलेल्या या टोळीने पणजीतील एका सराफी दुकानातून सोन्याचे दागिने चोरले होते. या घटनेची माहिती सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या प्रकरणावरून उघड झाली होती.

ही घटना काही महिन्यांपूर्वीची आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे टोळीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांना त्यानंतर केलेल्या चौकशीत ही टोळी चोरीनंतर बंगळुरूला गेल्याची माहिती समोर आली. त्यानुसार गोवा पोलिसांनी बंगळुरू पोलिसांच्या साहाय्याने या टोळीचा शोध सुरू केला.

ही टोळी अट्टल गुन्हेगार असल्याचे उघडकीस आल्याने पणजी पोलिसांनी बंगळुरू येथे जाऊन त्यांना गजाआड केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT