गोवा

कोंबड्या घेऊन आलेल्यांना लुटण्याचा प्रयत्न फसला

चोरट्यांचा चोवीस तासांत लावला छडा; साळगाव पोलिसांची कामगिरी

दैनिक गोमन्तक

कळंगुट : गडहिंग्लज येथून ब्रॉयलर कोंबड्यांची गोव्यात डिलीव्हरी करण्यासाठी आलेल्या शिवराज पाटील व अन्य तिघांना दमदाटी करून त्यांचे वाहन घेऊन पळ काढलेल्या परशुराम कांबळे व त्याच्या सहकारी मित्रांना (सांगोल्डा) बारा तासाच्या आत मुद्देमाल तसेच वाहनासह ताब्यात घेण्यात साळगाव पोलिसांना यश आले आहे.

साळगाव पोलिस स्थानकाचे निरीक्षक सचिन लोकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गडहिंग्लज येथील शिवराज पाटील आपल्या अन्य दोघा साथीदारांसह ब्रॉयलर कोंबड्यांची गाडी (क्र. KA-22 C-9320) घेऊन कळंगुटमध्ये डिलीव्हरी करण्यासाठी निघाले असता स्कूटरवरून त्यांचा पाठलाग करीत आलेल्या परशुराम कांबळे तसेच अजय देवुसकर (रा. सांगोल्डा) यांनी स्कूटर त्यांच्या जीपगाडी समोर आडवी घातली व खंडणीसाठी त्यांना दमदाटी करीत गाडीची चावी काढून घेतली. यावेळी गाडीचे चालक शिवराज पाटील तसेच संशयितांची बाचाबाची सुरू असतानाच जबरदस्तीने गाडीचा ताबा घेत परशुराम कांबळे व त्याच्या तिघाही साथीदारांनी तेथून पळ काढला.

याबाबत शिवराज पाटील व त्यांच्या अन्य तिघा साथीदारांनी साळगाव पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर साळगावचे पोलिस निरीक्षक सचिन लोकरे यांनी मोलेभाट साळगाव येथून परशुराम कांबळे याला ताब्यात घेतले तसेच चौकशीअंती कांबळे याचा अन्य एक साथीदार अजय देवूसकर याच्याही मुसक्या आवळण्यात यश मिळविले, तथापि तिसरा संशयित अद्याप सापडलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Train Accident: धूर, आरडाओरडा आणि रक्ताने माखलेले लोक! लंडनमध्ये दोन ट्रेनची भीषण धडक; चालकाचा जागीच मृत्यू, 80 हून अधिक प्रवासी जखमी VIDEO

'ओपन जेल'साठी राजस्‍थान दौरा; कोर्टाचे गृह विभागाला निर्देश, कारागृह नियम दुरुस्तीसाठी समिती

NEET Exam: साडेचार हजार विद्यार्थी देणार 'नीट' परीक्षा; सरकारी यंत्रणा सज्ज, परीक्षा केंद्रांवर कदंबची विशेष बससेवा

Kisan Credit Card Scheme: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आरबीआयने 'किसान क्रेडिट कार्ड'च्या नियमात केला मोठा बदल; कधीपासून होणार लागू?

Goa Police: पीएसआय पदे तात्काळ भरा, प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना न्याय द्या; गिरीश चोडणकरांची मागणी

SCROLL FOR NEXT