कुडचडे: एका अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी कुडचडे येथील एका संशियत आरोपीला काल (दि. १८ ऑक्टोबर) रोजी अटक केली आहे. आरोपीकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याची ही पहिली वेळ नसून याआधी देखील दीपेश साळगावर नावाच्या या आरोपीने असे अमानुष कृत्य केल्या प्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली होती.
दीपेश साळगावर याच्यावर एका अल्पवयीन मुलीला विवस्त्र करत तिची छायाचित्रे काढून ब्लॅकमेल करण्याचा आरोप दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार आरोपी एप्रिल २०१९ पासून पीडितेचा छळ करत होता.
आरोपीला सहकार्य न केल्यास किंवा त्याच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केल्यास तिची छायाचित्रे सगळीकडे प्रसारित करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीला मारहाण केली जात होती. या प्रकरणाचा काल छडा लागला असून कुडचडे पोलिसांनी त्याला अटक केली आहे आणि आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.