Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोव्यातील व्यापाऱ्याची 5 लाखाची फसवणूक; छत्तीसगडमधून भामट्याला केली अटक, एक फरार

गोवा पोलिसांची कारवाई

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Police: गोव्यातील एका व्यावसायिकाची 5 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी बुधवारी छत्तीसगडमधून एकाला अटक केली आहे. तरूण भट्टाचार्य (वय ६३) असे संशयिताचे नाव आहे.

हे प्रकरण अनप्लग्ड मेटल वर्क्सचे मालक अभिलाष वेलिंगकर यांच्या तक्रारीशी संबंधित आहे. उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक निधिन वाल्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेलिंगकर यांनी तक्रार दिली होती.

त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, छत्तीसगडस्थित भिलाई येथील दिव्यांसी एंटरप्रायझेस या कंपनीचे मालक अमित पांडे आणि प्रतिनिधी तरुण भट्टाचार्य यांच्यामार्फत त्यांना आगाऊ पेमेंटवर चार दिवसांत १३ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे स्टील देण्याचे वचन दिले होते.

त्यासाठी 5 लाख रुपये आगाऊ रक्कम घेतली होती. मात्री दीड महिना उलटून गेला तरी स्टील देखील दिले नाही आणि दिलेले पैसेही परत केले नाहीत. वेलिंगकर यांनी पैशासाठी तगादा लावल्यानंतर परतफेड म्हणून अडीच लाख रूपयांचे दोन धनादेश दिले गेले.

पण ते धनादेशही वटले नाहीत. त्यामुळे वेलिंगकर यांनी तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी भट्टाचार्य याला छत्तीसगडमधील घरातून ताब्यात घेतले. तर अमित पांडे फरार झाल्याचे समजते.

या कंपनीने लोहपोलाद पुरविण्याच्या बहाण्याने अनेक कंपन्या, व्यावसायिकांना गंडा घातल्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT