Accused Dainik Gomantak
गोवा

Cyber Crime: एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली वेश्या रॅकेट चालवणाऱ्या टोळीतील तिसरा आरोपी गजाआड; गोवा पोलिसांची कारवाई!

Goa Police: एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली वेश्या रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा गोवा पोलिसांनी पर्दाफाश केला. यातच आता, तिसऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.

Manish Jadhav

एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली वेश्या रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा गोवा पोलिसांनी पर्दाफाश केला. या टोळीतील तिसऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यातही पोलिसांना आता यश आले आहे. उत्तरप्रदेशातील गाझीयाबादमधून या आरोपीला अटक करण्यात आली. योगेश कुमार असे या आरोपीचे नाव आहे. योगेशच्या शोधात गोवा पोलिसांच्या टीमने गाझियाबाद गाठले. यापूर्वी, या प्रकरणात सय्यद उस्मान (54, आंध्रप्रदेश) आणि महम्मद महबुल्ला (30, हरियाणा) या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, योगेशच या रॅकेटचा मास्टरमांइड होता. त्यानेच deepikaverma.com नावाची वेबसाईट बनवली होती. घटनास्थळावरुन पोलिसांनी योगेशकडील सीपीयू जप्त केला. तसेच, आयटी कायद्याच्या कलम 67 अन्वये पोलिसांनी योगेशविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.

या प्रकरणाशी संबंधित असलेल्या सुमारे 78 अश्‍लिल एस्कॉर्ट सर्व्हिस संकेतस्थळे ब्लॉक करण्यात आल्याची माहिती यापूर्वी क्राईम ब्रँचचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली होती. हे संशयित एस्कॉर्ट सर्व्हिस संकेतस्थळावर महिलांची अश्‍लिल छायाचित्रे प्रसिद्ध करुन गोव्यात एस्कॉर्ट सेवेची माहिती देत असत. त्यानंतर ते ग्राहक आणि दलाल यांच्या संपर्क साधायचे. दरम्यान, डीवायएसपी राजेश कुमार आणि एसपी क्राईम राहुल गुप्ता यांच्या देखरेखीखाली पीआय दत्ताराम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Road Accidents: राज्यात 80% रस्त्यावरील मृत्यू दुचाकी अपघातांमुळे; पहिल्या 5 महिन्यांत 108 जणांनी गमावले प्राण

Monsoon Arrival in Kerala: प्रतीक्षा संपणार! मान्सून 4 जूनला केरळमध्ये धडकणार; कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा

Mandovi River Casinos: मांडवी नदीतील कॅसिनोंच्या संचालनाची स्वतंत्र चौकशी करा! 'इनफ इज इनफ' तर्फे राज्यपालांकडे मागणी

Goa Murder Case: मोबोर खून प्रकरण: तिघे गजाआड पण खुनासाठी वापरलेलं 'ते' हत्यार कुठे? आठवडा उलटला तरी कोलवा पोलिसांसमोर मोठे आव्हान!

गोव्यात मध्यरात्री थरार! चालत्या कारचा पाठलाग करुन अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण; फातोर्डा पोलिसांकडून 4 जणांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT