madgaav police.jpg 
गोवा

ऑनलाइन जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना गोवा पोलिसांकडून अटक  

दैनिक गोमंतक

मडगाव : दक्षिण गोवा पोलिसांच्या पेट्रोलिंग पथकाने शुक्रवारी सायंकाळी मडगावतील गांधी मार्केटमधील बेकायदेशीर ऑनलाइन जुगार खेळणाऱ्या कसिनोवर धाड टाकली. यावेळी 11 जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले आहेत.  पोलिसांनी 80 हजार रुपये रोख,  11 संगणक, प्रत्येकी 25 हजार रुपये किमतीचे इंटरनेट मॉडेम, एक राउटर, दोन वाय-फाय डोंगल  आणि 35 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  दक्षिण गोव्याचे  एसपी पंकजकुमार सिंग यांनी  माध्यमांना याबाबत माहिती दिली आहे.  अंबजी येथील रहिवासी राजेश नाईक याच्या वतीने लोटलीकर इमारतीत ऑनलाईन जुगार खेळताना राजेश नाईक या इसमाला पेट्रोलिंग पथकाने रंगहाथ पकडला आहे.  (Goa police arrest nine online gamblers) 

या दोघांव्यतिरिक्त पोलिसांनी ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या नऊ जणांनाही अटक केली आहे. यात आसामचा  प्रमोद राभा,  यूपीचा राहूल गौड, मडगावातील संतोष जोशी,  केरळचा संतोष नायर आणि सादिक विलामुल्ली, मध्यप्रदेशचा प्रकाश सिंग, कर्नाटकचा  येल्लाप्पा शेलुडी,  मेई सिकरचा लक्ष्मण सिंग, तामिळनाडूकहा  गोबी सी, यांना दक्षिण पोलिसांनी अटक केली आहे. यातील बहुतेक आरोपी हॉटेलमध्ये काम करत होते आणि जवळच्या लॉज आणि शयनगृहात राहत राहत असल्याची माहिती दक्षिण गोवयाचे एसपी पंकाजकुमार सिंग यांनी दिली आहे. 

तथापि, दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी झिर केलेल्या संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन  केल्याप्रकरणी या नऊ जणांवर सार्वजनिक जुगार कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे.  तसेच पुढील तपास गोवा पोलिस करत आहेत. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

Bicholim Marigold Farming : डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT