Goa Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: ड्रग्ज प्रकरणातील दोघा 'परप्रांतीयांना' जामीन; गोवा पोलिसांनी छापेमारीत केली होती अटक

Goa Drugs News: दोनापावला येथे छापा टाकून गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) पाच किलो गांजा जप्त केला होता. पोलिसांनी जप्त केलेला गांजा हा किरकोळ स्वरूपाचा आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Dona Paula Crime News

पणजी: दोनापावला येथे छापा टाकून गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) पाच किलो गांजा जप्त केला होता. पोलिसांनी जप्त केलेला गांजा हा किरकोळ स्वरूपाचा आहे. संशयित नीतेश सिंग आणि राजू सिंग हे परराज्यातील असल्यामुळे त्या दोघांना कोठडीत ठेवता येत नसल्याचे निरीक्षण नोंदवत पणजी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने या दोघांना २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलका व इतर अटीवर जामीन मंजूर केला.

अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पथकाने १३ सप्टेंबर रोजी रात्री ८.४५ ते मध्यरात्री ०.१५ वा. सापळा रचून दोनापावला (Dona Paula) येथील जीटीडीसीच्या पार्किंग परिसरात संशयास्पदपणे फिरत असताना दिसले. खबऱ्यांनी दिलेली माहिती तंतोतंत जुळत असल्यामुळे पथकाने त्या दोघांची चौकशी केली. दोघा संशयास्पद तरुणांना ताब्यात घेण्यात आले होते.

ही कारवाई खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली होती. पथकाने नीतेश सिंग याची झडती घेतली असता, त्याच्याकडून एका बॅगेत असलेला ५ किलो गांजा जप्त केला. बाजारपेठेत या गांजाचे पाच लाख रुपये असून याव्यतिरिक्त त्याच्याकडून १,५०० रुपये जप्त केले. त्याच्या सोबत असलेल्या राजू सिंग याची झडती घेतली असता त्याच्याकडून काहीच सापडले नाही. मात्र ते दोघे बरोबर गोव्यात आल्यामुळे ते या ड्रग्ज व्यवसायात गुंतल्याने त्या दोघांच्या विरोधात अमलीपदार्थ विरोधी कायद्याचे कलम अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली होती.

चौकशीसाठी न्यायालयाने त्या दोघांना प्रथम पोलिस कोठडी ठोठावली व ती संपल्यानंतर न्यायालयीन कोठडी ठोठावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

SCROLL FOR NEXT