Cyber Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Police : वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गोवा पोलिसांचं एक पाऊल पुढे

गोवा पोलिसांनी सोमवारी बिट्स पिलानीच्या के के बिर्ला गोवा कॅम्पससोबत एक करार केला आहे, ज्याच्या माध्यमातून पोलिसांना सायबर क्राईमला रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरवलं जाणार आहे.

आदित्य जोशी

Goa Police : गोव्यातील सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी आता हायटेक पाऊल उचललं आहे. गोवा पोलिसांनी सोमवारी बिट्स पिलानीच्या के के बिर्ला गोवा कॅम्पससोबत एक करार केला आहे, ज्याच्या माध्यमातून पोलिसांना सायबर क्राईमला रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरवलं जाणार आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणं गोवा पोलिसांना आणखी सोपं होणार आहे.

या करारामुळे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून संशोधन आणि विविध प्रकल्प राबवून सायबर गुन्ह्यांचा छडा लावला जाणार आहे. भविष्यात वाढत्या सायबर गुन्ह्यांचा धोका ओळखून गोवा पोलिसांकडून हा करार करण्यात आला आहे. गोव्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग आणि बिट्स पिलानी गोवा कॅम्पसचे संचालक सुमन कुंदू यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

या करारातून किचकट गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी कृतीशील पर्याय उपलब्ध केले जाणार असून लोकांमध्येही सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. गोवा पोलीस आणि बिट्स पिलानीकडून तंत्रज्ञान, माहिती, कौशल्य आदी गोष्टींची देवाणघेवाण केली जाणार आहे. या कराराच्या माध्यमातून गोवा पोलीसांना विशेष प्रशिक्षणही दिलं जाणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून गोवा पोलीस आणि देशासाठी काम करण्याची संधी मिळाली असल्याचं बिट्स पिलानीच्या संचालकांनी म्हटलं आहे. याआधी गोवा पोलिसांकडून आयआयटी गोवासोबतही अशाच पद्धतीचा करार करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

SCROLL FOR NEXT