Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: धारबांदोड्यातून 2.4 लाखांच्या वॉटर पाईप्सची चोरी; फोंड्यातील एकास अटक

पाच दिवसांनी पोलिसांनी सापडला आरोपी

Akshay Nirmale

Goa Police: धारबांदोडा येथील पेटके येथून 2 लाख 40 हजार रूपये किंमतीच्या वॉटर पाईप्सची चोरी केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती.

या प्रकरणी ऋषभ पाटील यांनी तक्रार दिली होती. ते देवश्री गार्डन अपार्टमेंट, एसबीआय कॉलनी, पर्वरी, सांगोल्डा येथे राहतात. या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सार्वजनिक जागेत ठेवलेल्या एकूण 6 वॉटर पाईप्स चोरीला गेल्या होत्या, असे तक्रारीत म्हटले होते.

त्यावरून पोलिसांनी तपासास सुरवात केली होती. पोलिसांनी या चोरीचा माग काढत युवराज दशरथ गोसावी (वय 44) या संशयिताला अटक केली आहे. तो फोंड्यातील कुर्टी, कोपारवाडा दमयंती फार्म येथील रहिवासी आहे.

त्याच्यावर फोंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर त्याला कोर्टात हजर केले गेले. कोर्टाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस त्याच्याकडे इतरही चोऱ्यांबाबत चौकशी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT