Goa Electricity Dainik Gomantak
गोवा

Goa Electricity: गोव्यात वीज खात्याकडून पथदीपांचा भार सामान्य ग्राहकांवर

Goa Electricity: वीज खात्याकडून पथदीपांचा भार वीज ग्राहकावर लादला जात आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Electricity: वीज खात्याकडून पथदीपांचा भार वीज ग्राहकावर लादला जात आहे. मात्र, वीज खात्याने या संदर्भात कोणतीच पूर्वसूचना न देता वीज बिलात पब्लिक लायटिंग ड्युटी या अंतर्गत वीज ग्राहकांकडून वसूल करण्यात येत आहे.

दरम्यान, या संदर्भात योग्य प्रकारे जागृती झाली नसल्याने सामान्य वीज ग्राहक वाढीव वीज बिल पाहून बुचकळ्यात पडले आहेत. घरघुती वीज ग्राहकांना प्रति युनिट पाच पैसे व व्यवसायिक वीज ग्राहकांना प्रति युनिट वापरावर आठ पैसे या दराने वसूली करण्यात येत आहे.

तसेच, या संदर्भात वीज अभियंत्यांशी संपर्क साधला असता या संदर्भाच्या दुरुस्तीला विधानसभेत मान्यता मिळाल्यानंतर त्याची कार्यवाही करण्यात आली आहे असे सांगण्यात आले. यापूर्वी पथदीप दुरुस्तीचा खर्च पंचायती पालिकेकडून करण्यात येत होता. पण तो भार वीज खात्याने उचलला आहे, असे सांगण्यात आले.

या निर्णयाला पैंगीणचे पंच सतीश पैंगीणकर विरोध केला आहे. ग्राहकांना दहा ते वीस रुपयांपर्यत वाढीव रक्कम बिलापोटी भरावे लागत आहेत. त्याचा वीज खात्याने पुनर्विचार करण्याची मागणी पैंगीणकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT