Court Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोव्यातील 16 वर्षीय शाळकरी मुलीवर अपहरण करुन लैंगिक अत्याचार; महाराष्ट्रातील 39 वर्षीय नराधमाचा कोर्टाने फेटाळला जामीन

Goa Sexual Assault Case: पीडित मुलगी या अत्याचारामुळे गर्भवती राहिली असून गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.

Manish Jadhav

पणजी: दक्षिण गोव्यात एका 16 वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण करुन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या 39 वर्षीय आरोपीचा जामीन अर्ज पणजी येथील विशेष जलदगती न्यायालयाने फेटाळून लावला. पीडित मुलगी या अत्याचारामुळे गर्भवती राहिली असून गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.

मूळचा महाराष्ट्रातील असलेला हा 39 वर्षीय आरोपी काही काळापासून गोव्यात (Goa) राहत होता. त्याने दक्षिण गोव्यातील एका अल्पवयीन शाळकरी मुलीचे अपहरण केले आणि तिला अज्ञात ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले. या सततच्या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली, त्यानंतर हे संतापजनक प्रकरण उघडकीस आले. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध अपहरण आणि 'पोक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली होती.

न्यायालयाचा कडक पवित्रा

आरोपीने आपल्या वकिलामार्फत न्यायालयात (Court) जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी या जामिनाला जोरदार विरोध केला. "आरोपीने केवळ एका अल्पवयीन मुलीचे अपहरणच केले नाही, तर तिच्यावर वारंवार बलात्कार करुन तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले. मुलगी गर्भवती असल्यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर असून अशा नराधमाला जामीन दिल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल," असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायालयाने स्पष्ट केले की, पीडितेचे वय आणि तिच्यावर झालेले अत्याचार पाहता आरोपीला जामीन देणे योग्य ठरणार नाही. पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

पालकांमध्ये चिंतेचे वातावरण

या घटनेमुळे दक्षिण गोव्यात खळबळ उडाली असून शाळकरी मुलांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी अशा गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करावी आणि खटला जलदगतीने चालवून पीडितेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Protest Panaji: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी! 'सीजेपी'चे 11 ऑक्टोबरला पणजीत आंदोलन, अभिजीत दीपके राहणार अनुपस्‍थित

Illegal Construction: बेकायदा बांधकामांची माहिती द्यायला टाळाटाळ? पंचायत सचिवांना दंड ठोठावणार; गोवा खंडपीठाचा कठोर इशारा

BJP Election Preparation: गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची ताकदीनिशी तयारी; भारती पवार-शिवप्रकाशांच्या उपस्थितीत CM सावंत-दामू नाईकांच्या बैठका

खरी कुजबुज: प्रदेश काँग्रेस एकसंध राहणार?

Birch Club Case: 'बर्च' क्लबच्या बनावट NOC प्रकरणात लुथरा बंधूंच्या जामिनावर पुन्हा सुनावणी; 2300 पानी दोषारोपपत्रामुळे प्रकरण गंभीर

SCROLL FOR NEXT