Ponda Municipality News| Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: व्यापाऱ्यांची फोंड्यात मागणी ; करवाढ मागे घ्या

Goa News: करवाढ अन्यायकारक असून नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी ही करवाढ मागे घ्यावी.

दैनिक गोमन्तक

Goa News: फोंडा नगरपालिकेने काही दिवसांपूर्वी घरपट्टी व व्यावसायिक करात वाढ केल्याने या कृतीचा निषेध करीत फोंड्यातील व्यापारी वर्गाने फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांची भेट घेऊन ही करवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी केली.

गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनीही नगराध्यक्षांची भेट घेऊन करवाढीवर पुनर्विचार करावा असे सुचवले. व्यापाऱ्यांतर्फे फोंडा बिझनेस फोरमने त्यासाठी पुढाकार घेतला होता.

कोविडमुळे डबघाईला आलेला उद्योग व्यवसाय आताच कुठे सावरत आहे, अशा स्थितीत व्यापाऱ्यांना व्यावसायिक करात तसेच घरपट्टीत फोंडा पालिकेने वाढ केल्याने ही चारशे टक्के करवाढ भरणे लोकांना शक्य होणार नाही, असे व्यापारी मंडळाने स्पष्ट केले.

दुर्गादास कामत करवाढीसंबंधी म्हणाले की, फोंडा पालिकेने लोकांना विश्‍वासात न घेता ही करवाढ केली आहे. ही करवाढ अन्यायकारक असून नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी ही करवाढ मागे घ्यावी.

दरम्यान, येत्या शुक्रवारी 18 रोजी होणाऱ्या पालिकेच्या बैठकीत या विषयावर चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT