Goa Petrol-Diesel Prices 21 November 2023:
Goa Petrol-Diesel Prices 21 November 2023:  Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol-Diesel Prices: उत्तर गोवा, पणजीतील पेट्रोल-डिझेल दरामध्ये वाढ; दक्षिण गोव्यातील किंमतीत घट

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Petrol-Diesel Prices 21 November 2023: देशातील तेल कंपन्यांकडून दररोज पेट्रोलियम उत्पादनांचे नवीन दर जाहिर केले जात असतात. मंगळवारी 21 नोव्हेंबर रोजी इंधन दराच्या नवीन किंमती जाहीर केल्या.

त्यानुसार गोव्यातील इंधन दरांमध्ये बदल झाले आहेत. पेट्रोल दरात उत्तर गोवा आणि पणजी येथे प्रतीलीटर 0.13 पैशांनी वाढ झाली. तर दक्षिण गोव्यातील प्रतीलीटर दर 0.64 पैशांनी घटले.

डीझेल दरांमध्येही उत्तर गोवा आणि पणजी येथे प्रतीलीटर 0.13 पैशांनी वाढ झाली तर दक्षिण गोव्यातील दरांमध्ये प्रतीलीटर 0.61 पैशांची वाढ झाली.

इस्त्रायल हमास युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतींवर प्रचंड दबाव आहे. दरम्यान, इंधनाच्या किमतींवर चलन विनिमय दर, कच्च्या तेलाच्या किंमती, जागतिक संकेत इंधनाची मागणी या घटकांचा परिणाम होत असतो.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.54

Panjim ₹ 97.54

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.10

Panjim ₹ 90.10

South Goa ₹ 89.68

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात

आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: पाच फूट अन् 45 किलोचा एक घड! सत्तरीतील शेतकऱ्याची कमाल; टिश्यू कल्चर पद्धतीनं घेतलं केळीचं उत्पादन

Goa Weather Update: ....तर गोव्यात भूस्खलनाचा धोका; डॉ. कामत

Margao: 'मला फरक नाही पडत', सरदेसाईंच्या जनता दरबारावर माजी मुख्यमंत्री काय म्हणाले?

Goa Traffic Police: बेकायदेशीर होर्डिंग्सविरुद्ध ‘एसओपी’ जारी; धडक मोहीम सुरू

Goa Today's News Live: दामोदर सप्ताहाचे यंदा 125वे वर्ष, 1 कोटी महसूलाचे टार्गेट!

SCROLL FOR NEXT