Goa Poilce Dainik Gomantak
गोवा

Goa Police: आजाराऐवजी अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक

Goa Police: आजारपणात मृत्यू येण्यापेक्षा वाहनांच्या अपघातात मृत्यू येण्याचे प्रमाण जास्त आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Police: "आजारपणात मृत्यू येण्यापेक्षा वाहनांच्या अपघातात मृत्यू येण्याचे प्रमाण जास्त आहे. अपघातात कुटुंबातील एक व्यक्तीचे निधन झाल्यास पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते. त्यासाठी युवकांनी वाहतुकीचे सर्व नियम पाळून जवाबदारीने वाहने चालवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पेडणे पोलिस स्थानकाचे निरीक्षक दत्ताराम राऊत यांनी केले.

वाहतूक सुरक्षानिमित्त येथील कदंब बस स्थानकावर विद्यार्थी, नागरिक व वाहन चालक, प्रवाशांसाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पेडणे वाहतूक निरीक्षक कमलाकांत कारापुरकर, पोलीस उपनिरिक्षक हरिष वायंगणकर, सहाय्यक वाहतूक निरिक्षकअधीकारी, पोलीस कर्मचारी स्वप्नील शिरोडकर, विशाल नाईक, राजेश गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी वाहतूक निरिक्षक कमलाकांत कारापुरकर यांनी वाहतुकीचे नियम व वाहन चालकाची जवाबदारी यावर मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विद्यार्थ्याना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली.

दत्ताराम राऊत, पोलिस निरीक्षक-

आपण जे काबाडकष्ट केले तशी स्थिती आपल्या मुलांवर येऊ नये म्हणून आईवडील मुलांना स्कूटर,मोटारसायकल घेऊन देतात. पण भरधाव वेगात दुचाकी हाकून युवक आपले कुटुंब किंवा कुणाचा तरी नाहक बळी घेतात. त्यासाठी कायद्याचे पालन करून व नियंत्रण ठेवून वाहन चालवणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT