Revolutionary Goans Dainik Gomantak
गोवा

Revolutionary Goans: दीड कोटी खर्चूनही पेडणे पालिका क्षेत्रातील स्मशानभूमीची दुरवस्था कायम

‘आरजी’चा आरोप ः वीज,पाणी सुविधा पुरवण्यात सरकार अपयशी ठरल्याचा ठपका

गोमन्तक डिजिटल टीम

Revolutionary Goans पेडणे पालिका क्षेत्रात दीड कोटी रुपये खर्चून चार वर्षापूर्वी बांधलेल्या स्मशानभूमीची दुरावस्था झाली सरकार या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आवश्यक सुविधा देण्यातही अपयशी ठरले आहे, असा आरोप ‘आरजी’ पक्षाचे गौरेश मांद्रेकर यांनी केला.

या स्मशानभूमीत वीज व पाण्याची व्यवस्था नाही ती त्वरित करावी,अशी मागणी ‘रिव्होल्युशनरी गोवा’चे उत्तर गोवा अध्यक्ष गौरेश मांद्रेकर यांनी केला. पत्रकार परिषदेला आरजीचे कार्यकर्ते सुजय म्हापसेकर, अध्यक्ष शिवानंद तांबोसकर, तेजस देऊस्कर, विशाल आसोलकर उपस्थित होते.

शिवानंद तांबोसकर म्हणाले की ,स्मशानभूमी २०१९ साली बांधली.पण त्याला वीज व पाणी पुरवठा न केल्याने क्रियाकर्म झाल्यानंतर बरीच गैरसोय होते. पेडणे नगरपालिकेने यांत लक्ष घालून या स्मशानभूमीत वीज व पाण्याची त्वरित व्यवस्था करावी. पेडणेतील स्मशानभूमीच्या समस्या तातडीने सोडवा,अशी मागणीही करण्यात आली.

पेडणे तालुक्यातील अनेक गावांत पक्क्या स्वरूपाच्या स्मशानभूमी नाहीत. पावसाळ्यात किंवा रात्रीच्यावेळी अंत्यसंस्कार करणे अतिशय त्रासदायक ठरते. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह या स्मशानभूमीत आणले जातात. पण या स्मशानभूमीत आवश्यक त्या सोयीसुविधा नसल्याने लोकांची मोठी गैरसोय होते. सरकारने या गैरसोयी तातडीने दूर करायला हव्यात.

-तेजस देऊस्कर, पेडणे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: फक्त 3 राशींना मिळणार मोठा लाभ! लक्ष्मी नारायण योग उघडणार तुमच्या नशीबाचं दार

Goa Rivers: गोव्यातील नद्यांना धोका! मासेमारी संकटात, गावे पुराच्या विळख्यात सापडण्याची शक्यता; वाचा NIOचा अहवाल

Ganesh Chaturthi 2025: 4 पिढ्यांपासून मातीच्या गणेशमूर्तींची परंपरा, केरी सत्तरी येथील ‘बाबल्याची शाळा’

"मी सोमवारी गोव्यात येतोय", पुण्यातला 'तो' पर्यटक देणार कळंगुट पंचायतीला उत्तर; Watch Video

Goa Live News: ओल्ड गोव्यात रस्त्याच्या कडेला आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT