नवेवाडे येथील पाणीटंचाईमुळे पैसे खर्च करून टँकरद्वारे पाणी भरताना महिलावर्ग Dainik Gomantak
गोवा

Goa: नवेवाडेतील रहिवाशांची पाण्यासाठी वणवण

दाबोळी नवेवाडेतील काही भागात गेल्या चार आठवड्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने पाणी येत नसल्याने स्थानिक रहिवाशांना पैसे खर्च करून पाणी विकत घ्यावे लागत आहे.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: सार्वजनिक बांधकाम (Public works) पाणी विभागाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या आठवड्यापासून नवेवाडे येथील काही भागात नळाला पाण्याचा थेंब सुद्धा येत नसल्याने, येथील रहिवाशांनी संबंधित विभागावर मोर्चा नेण्याचा विचार केला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तसेच या भागातील रहिवाशांना पैसे खर्च करून टँकरद्वारे पाणी (Water) आणावे लागत असल्याने स्थानिक रहिवाशांनाकडे आता एकच पर्याय राहिला तो वास्को बायणा येथील सार्वजनिक बांधकाम विभागावर मोर्चा घेऊन जाण्याचा.

दाबोळी नवेवाडेतील काही भागात गेल्या चार आठवड्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने पाणी येत नसल्याने स्थानिक रहिवाशांना पैसे खर्च करून पाणी विकत घ्यावे लागत आहे. नवेवाडे हाऊसिंग बोर्ड परिसरात तर गेल्या काही आठवड्यापासून नळाला पाणी येत नसल्याने स्थानिकांनी बायणा येथील सार्वजनिक बांधकाम विभागावर मोर्चा नेण्याचे ठरवले होते. परंतु स्थानिक मुरगावचे नगरसेवक सुदेश भोसले यांच्या मध्यस्तीमुळे मोर्चा नेण्यात आला नाही. दरम्यान पाण्याची आणखीन तीव्र टंचाई भासल्याने स्थानिक रहिवाशांनी मोर्चा काढण्याचे निश्चित आहे.

वास्को बायणा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला नवेवाडे भागातील रहिवाशांतर्फे अनेक वेळा पाण्याच्या समस्या विषयी तक्रारी देऊन सुद्धा पाणी येत नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून मोर्चा नेण्याचा ठरवले आहे. गेल्या चार आठवड्यापासून पैसे खर्च करून टॅंकरद्वारे पाणी घ्यावे लागत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या महिन्याचे पाण्याचे बिल माफ करावे अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

Cooperative Societies: 'सहकार'चा कारभारच अनिश्चित; 5,853 संस्थांपैकी 3,357 संस्थांची आर्थिक माहितीच सरकारकडे नाही, नफा-तोट्याचे चित्रही अस्पष्ट

River Pollution: गोव्यात 6 नद्यांचे प्रदूषण कायम; मांडवी-झुआरीसह शापोरा, तेरेखोल आणि साळ नदीत फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक

Shani Gochar 2026: 9 ऑक्टोबरपासून सुरु होणार 5 राशींचा सुवर्णकाळ! करिअर, व्यवसायात धनलाभाची संधी; मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT