Yewale Amruttulya Tea Dainik Gomantak
गोवा

Yewale Amruttulya Tea: गोवेकरांनाही 'अमृततुल्य' मसालेदार चहाची भुरळ

दैनिक गोमन्तक

Panjim: चहा पिणे किंवा पाजणे हा शिष्टाचाराचा भाग असल्याचे आताशा गोमंतकीयांच्याही अंगवळणी पडत आहे. चहा घेता घेता चर्चा करता येते, हे ‘चाय पे चर्चा’ ने सिध्द केल्याचे गोव्यातही रस्त्तोरस्ती दिसणाऱ्या नामवंत कंपन्यांच्या फ्रँचाईझींसमोर दिसणाऱ्या गर्दीवरून दिसते.

गोव्यात काही वर्षांपूर्वी फक्त चहाचा व्यवसाय करणारी दुकाने दिसत नव्हती, पण आता अमृततुल्य, मसालेदार, अशा विविध विशेषणांनी युक्त फलक विविध ठिकाणी दिसत आहेत. अनेक नामवंत कंपन्यांच्या फ्रँचाईझींनी चहा विक्रीसाठी मद्यासाठी प्रसिध्द असलेल्या गोव्याकडे मोर्चा वळविला आहे.

20 ते 25 रुपये देऊन हॉटेलमध्ये बसून चहा पिण्यापेक्षा दहा-पंधरा रुपयांत मिळणारा गुळाचा किंवा चवीसाठी ओळख निर्माण करणाऱ्या फ्रँचाईझींचा चहा पिण्यासाठी आता गोमंतकीयांचीही पावले, अशा ठिकाणांकडे वळत आहेत.

गोव्याबाहेर सध्या अनेक राज्यांत विविध चहा-कॉफी विकणाऱ्या फ्रंचाईझींची मोठी साखळी आहे. अशा साखळी कंपन्यांनी गोव्यातील अनेक शहरांमध्ये आपला विस्तार केला आहे. राजधानी पणजीत सध्या चार मानांकित फ्रँचाईझीचे चहाचे स्टॉल नजरेस पडत आहेत. चारही स्टॉलवर सकाळपासून सायंकाळपर्यंत चहा पिणाऱ्यांची गर्दी दिसतेय हा एक वेगळा अनुभव म्हणावा लागेल.

कारण यापूर्वी ठिकठिकाणी मद्याच्या दुकानांची संख्या पाहता, फक्त चहा-कॉफीची दुकाने कशी चालतील? असा प्रश्‍न नक्कीच पडत होता. परंतु परराज्यांत विस्तारलेल्या अनेक नामवंत चहा कंपन्यांनी आपली फ्रँचाईझी सुरू केली, अन् बघता-बघता ही दुकाने काही कालावधीत लोकांच्या पसंतीसही उतरली.

बांदोडकर मार्गावरील धेंपो हाऊसजवळ असलेल्या आरोग्य ‘अमृततुल्य’ स्टॉलधारकाच्या मते केवळ पर्यटकच नव्हे, तर गोमंतकीयही चहा पिण्यासाठी आवर्जुन येतात. दहा रुपयांत चहा मिळत असल्याने अन्य हॉटेलपेक्षा कमी दरात आणि चवदार चहा कुणाला नको, असेही त्यांचे म्हणणे आहे.

पणजीत अनेक स्टॉल्‍स

पणजीत सध्या आरोग्य, पाहुणचार, सलगर, सनराईज अशा चहाच्या फ्रंचाईझीचे स्टॉल दिसतात. सर्वात पहिल्यांदा कदंब बसस्थानक परिसरात ‘हरमन चहावाला’ हा स्टॉल होता. तिथे चहा पिणाऱ्यांची मोठी गर्दी व्हायची. परंतु या दुकानाला दिलेल्या परवानगी विरोधात तक्रार आल्याने महापालिकेला या दुकानाचा व्यवसाय परवाना रद्द करावा लागला. असे असले तरी इतर फ्रंचाईझींनी राज्यभर आपले जाळे विस्तारले आहे.

वाजवी दरात भागते ग्राहकांची तलफ

कोल्हापूरस्थित असलेल्या ‘सलगर अमृततुल्य’ने गोव्यात प्रमुख शहरात पाऊल टाकले. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना उत्तम चहा, कमी दरात मिळावा, यासाठी सलगर अमृततुल्यने फ्रंचाईझी दिल्या आहेत. उत्तम चव आणि दर्जेदार चहाबरोबरच ब्रँडचे नावही पर्यटकांमुळे सर्वदूर जाण्यास मदत होते, असे विक्री प्रतिनिधींनी ‘गोमन्तक’ला सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News: मळ्यातील तळ्याचे सुशोभिकरण कधी? पणजीतील स्थानिकांचा सवाल

Panaji Smart City: पणजी मनपा इमारतीला 'ग्रीन सिग्नल' कधी? दोनदा पायाभरणी; मात्र कामाला सुरुवात नाही

Chimbel Flyover: Saint Francis Xavier अवशेष प्रदर्शनापूर्वी एक मार्ग होणार खुला ; चिंबल उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वाकडे

Indian Coast Guards: भारतीय तटरक्षक दलाचा जोरदार सराव! गोवा, महाराष्ट्र किनारपट्टीच्या सुरक्षाव्यवस्थेचे सर्वेक्षण

Hina Khan: तिसऱ्या स्टेजच्या कॅन्सरशी लढणाऱ्या हिनाला गोव्यात वृद्ध महिलेकडून मिळाली प्रेरणा; देवाकडे केली प्रार्थना Video

SCROLL FOR NEXT