Goa Vegetable  Dainik Gomantak
गोवा

Goa Vegetable Price: गोव्यात अळू माडीला मागणी वाढली; जाणून घ्या दर

Goa Vegetable Price: पणजी बाजारात या माडीला मोठ्या प्रमाणात मागणी असून नागरिक आवर्जुन खरेदी करतात.

दैनिक गोमन्तक

Goa Vegetable Price: गोवा राज्यात अळू माडीला मोठ्या प्रमाणात मागणी असून मध्यम आकाराची ही माडी 80 ते 100 रुपये प्रति नग दराने विकली जात आहे, तर मोठी माडी 150 ते 200 रुपये दराने नागरिक विकत घेताना दिसतात. पणजी बाजारात या माडीला मोठ्या प्रमाणात मागणी असून नागरिक आवर्जुन खरेदी करताना दिसतात.

त्यासोबतच, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामानिमित्त विविध प्रकारच्या पालेभाज्या तसेच फळभाज्यांची लागवड केली होती आणि आता या पिकांचे प्रामुख्याने लालभाजी, मुळे, काही प्रमाणात भेंडी, गवार बाजारात दाखल झाले असून नागरिकांचा मोठ्या प्रमाणात या भाज्या खरेदीकडे कल आहे.

राज्यात कांदे, बटाटे तसेच इतर भाजीपालादेखील अजून महागच आहे. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून टोमॅटोच्या दरात काही प्रमाणात घट झाली आहे. टोमॅटो 30 रुपये प्रतिकिलोने विकले जात आहेत. हिरवी मिरचीचे दर काही प्रमाणात उतरले असून आता ती 80 रुपये प्रती किलो दराने विकली जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अजूनही हिरव्या मिरचीचे भाव दुप्पटच आहे.

कंदमुळे, फळांना अधिक मागणी

राज्यात आता व्रतवैकल्याचे दिवस सुरू असल्याने कणगा, करांदे, तसेच इतर कंदमुळे व फळांनादेखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे. केळी 60 ते 80 रुपये प्रतिडझन दराने विकली जात असून सफरचंद, डाळिंब, चिकू, मोसंबी, द्राक्ष यांचे दरदेखील वाढले आहेत.

दर प्रतिकिलो (रुपयांत)

कांदा 40, बटाटा 40, टोमॅटो 30, गवार 60, कोबी 40, फ्लॉवर 40, गाजर 60-80 भेंडी 70-80, शिमला मिरची 80, हिरवी मिरची 100

पालेभाजी प्रतिजुडी (रुपयांत)

मेथी 20, लालभाजी 20, कांदापात 20, मुळा 20, पालक 20, शेपू 10, पुदिना 10, कोथिंबीर 30 रु. एक जुडी, लिंबू 5 रुपयांना 1

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT